Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेनेलियाच्या निर्मितीत रितेशची 'छत्रपती शिवाजी'

जेनेलियाच्या निर्मितीत रितेशची 'छत्रपती शिवाजी'
, शनिवार, 26 डिसेंबर 2015 (14:14 IST)
मुंबई- अभिनेता रितेश देशमुखने जेनेलियाच्या निर्मितीत आणि रवी जाधवच्या दिग्दर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट करणार असल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. 
 
‘मुंबई फिल्म कंपनीच्या छत्रपती शिवाजी चित्रपटाचं दिग्दर्शन रवी जाधव करतील, ही घोषणा करताना मला अत्यंत अभिमान वाटत आहे’ असं रितेशने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. रितेशची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूझा-देशमुख हीनेही रितेशच्या ट्‌विटला प्रतिसाद दिला आहे. रितेशने घोषणा केल्यावर शिवाजींची भूमिका तोच साकारेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
रितेशने "लय भारी‘ या चित्रपटातून मराठी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला असून पहिल्याच चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. रितेशचा हा मराठीतील दुसरा चित्रपट असेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi