Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टॉम क्रूसची हिरॉइन होणार हुमा कुरेशी !

टॉम क्रूसची हिरॉइन होणार हुमा कुरेशी !
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने ‘द ममी’ चित्रपटाच्या तिसर्‍या सिक्वेलची ऑडिशन दिली आहे. यात हॉलिवूडचे टॉम क्रूस, सोफिया बॉटेलासारखे दिग्गज कलाकार काम करणार आहेत, अशी हुमाच्या प्रवक्त्याने माहिती दिली. 
 
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार हुमा आणि टॉम क्रूस यांची यात ऑनस्क्रिन जोडी असेल. याचसाठी तिने ऑडिशन दिली आहे. सध्या हुमा हॉलिवूडचा चित्रपट ‘ऑक्युलस’च्या रिमेकमध्ये बिझी आहे. याच्यात तिचा भाऊ साकिब सलीम याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi