Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रेयाची अपूर्ण इच्छा झाली पूर्ण

श्रेयाची अपूर्ण इच्छा झाली पूर्ण
, सोमवार, 17 ऑगस्ट 2015 (09:56 IST)
सध्याची आघाडीची गायिका श्रेया घोषालच्या सुरांची मोहिनी आपल्या चित्रपटाच्या संगीतावर असावी, असं आजच्या घडीला प्रत्येक भारतीय फिल्ममेकरला आणि संगीतकाराला वाटत असतं. त्यामुळे श्रेया घोषालने बॉलीवूड गाण्यांसोबतच प्रत्येक भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायलीयत. पण फोकपासून, जॅझपर्यंत, रॉकपासून पॉपपर्यंत, रोमँटिक गीतांपासून सॅडसाँगपर्यंत हरतर्‍हेची गाणी गाणार्‍या श्रेया घोषालची एक इच्छा मात्र गेले कित्येकवर्ष अपूर्ण होती.
 
तिने आपल्या इच्छेबद्दल सांगितलं, मी जेव्हा जेव्हा सिटी टूर करते. कॉन्सर्टमध्ये गाते, तेव्हा जिथे जिथे मराठी कानसेन भेटतात, त्यावेळी नेहमी मराठी गाण्यांची फर्माइश होते. खास करून, मी लावणी गायला हवी, असा अनेक मराठी ऑडियन्स आग्रह धरतात. आणि मग मी नेहमीच ‘रेशमाच्या रेघांनी’ गाते. कारण आजपर्यंत माझ्याकडे कधीच माझी लावणी नव्हती. कॉन्सर्टमध्ये गाताना नेहमी वाटायचे, अरे, अद्याप कोणत्याही चित्रपटात, मी लावणी कशी काय गायली नाही. चित्रपटासाठी लावणी गाण्याचे श्रेया घोषालचे इतके दिवस अधुरे राहिलेले स्वप्न शेवटी जसराज, सौरभ आणि हृषीकेश ह्या त्रिकुटाने नुकतेच ‘डबल सीट’ चित्रपटातून पूर्ण केले. आणि श्रेयाला एक मुंबईवरची फक्कड ‘मोहिनी’ ही लावणी गाता आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi