Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सैराटच्या चौकशी करण्याचे आदेश

सैराटच्या चौकशी करण्याचे आदेश
सैराट चित्रपटाच्या निर्मात्यांनी कॉपीराईट कायद्याचा भंग केला आहे का, याची चौकशी आता होणार आहे. सैराट सिनेमाची कथा बोभाटा कादंबरीवर बेतल्याचा दावा लेखक नवनाथ माने यांनी केला होता. निर्मात्यांची चौकशी करण्याचे आदेश पनवेल न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

‘बोभाटा’ या आपल्या कादंबरीवरुन नागराज मंजुळे यांनी ‘सैराट’ चित्रपटाची कथा ढापल्याचा आरोप माने यांनी पनवेल कोर्टात केला आहे. फसवणूक आणि कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी निर्मात्यांसह सात जणांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी नाथ मानेंनी न्यायाधीशांकडे केली आहे.

याप्रकरणाची चौकशी करुन 30 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत.बोभाटाचे लेखक नवनाथ उर्फ नाथ माने यांनी निर्माती कंपनी एस्सेल ग्रुपने कॉपीराईट हक्काचा भंग केल्याचा आरोप केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अंकुशचा अतरंगी लूक व्हायरल