Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हायवे 28 ऑगस्टला प्रदर्शित होणार

हायवे 28 ऑगस्टला प्रदर्शित होणार
, मंगळवार, 11 ऑगस्ट 2015 (09:50 IST)
हायवे या चित्रपटाचे प्रदर्शन काही महत्त्वाच्या तांत्रिक कामकाजामुळे तात्पुरते लांबणीवर टाकण्यात आले होते. आता सर्व तयारीने हा प्रवास अधिक रंगतदार आणि खुमासदार झाला असून येत्या 28 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित करण्याचे निश्चित करण्यात आले असलचे निर्माते वियन गानू, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी व लेखक अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी जाहीर केले आहे. 
 
लेखक गिरीश कुलकर्णी आणि दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची देऊळ या राष्ट्रीय सुवर्ण कमळ विजेत्या चित्रपटानंतरची महत्त्वाकांक्षी कलाकृती असून मराठीतील ही पहिली रोड मुव्ही आहे. 
 
मुंबईची धाव आणि पुण्याची चाल यांना जोडणारा मार्ग म्हणजे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे. मुंबई-पुण्याहून वेगवेगळ्या वाहनातून वेगवेगळी माणसे निघतात आणि हायवेवरील वाहने पळू लागतात. या एवढय़ाला वनलाइनला घेऊन लेखक-दिग्दर्शक जोडगोळी गिरीश-उमेश कुलकर्णी यांनी एक विचार करायला लावणारी, तरीही मनोरंजन करणारी चित्रकथा रंगवली आहे. 
 
उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी आणि विन गानू यांच्या आरभाट कलाकृती आणि खरपूस फिल्मस कृत हायवे हा नवा मराठी चित्रपट 24 जुलैला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार होता. त्याविषीचा सर्व तांत्रिक सोपस्कारांनी विशेष गती घेतली होती. 
 
पण घाईघाईत कोणतेही काम न करता प्रत्येक गोष्ट अगदी विचारपूर्वक व्हायला हवी, असा पवित्रा दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आणि लेखक-कलावंत गिरीश कुलकर्णी यांचा नेहमीच असल्याने त्यांनी हायवेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता हे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. 
 
आता चित्रपटाचे सर्व तांत्रिक कामकाज फत्ते झाल्यानंतर रसिक प्रेक्षकांचा विचार करून 28 ऑगस्ट ही तारीख निश्चित केल्याचे गिरीश आणि उमेश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi