Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘वायझेड’मध्ये मुक्ता बर्वेची एंट्री

‘वायझेड’मध्ये मुक्ता बर्वेची एंट्री
वायझेड सिनेमाच्या आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या टीझर्समध्ये पर्णरेखा (सई ताम्हणकर) आणि अंतरा (पर्ण पेठे) या दोघींची ओळख झाली असली, तरी सिनेमात या दोघींच्या जोडीला आणखी एक ‘वायझेड’ व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे आणि ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे. त्यामुळे मुक्ता, सई आणि पर्ण अशा तिघींच्या अभिनयातून ‘वायझेड’चं ‘फीमेल व्हर्जन’ पाहायला मिळणार असल्याचं सिनेमाचा दिग्दर्शक समीर विद्वांसने सांगितलं. 
 
समीर म्हणाला, ‘सिनेमाबद्दलची लोकांची उत्सुकता सतत वाढत राहावी या हेतूने आम्ही त्याच्या पोस्टरपासून एक एक गोष्ट सावकाशीने उलगडत गेलो आणि आता मुक्ताची एंट्री झाली आहे. मुक्ता बर्वे या सिनेमात आतापर्यंत कधी न पाहिलेल्या पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. किंबहुना मुक्ता, सई आणि पर्ण या तिघींच्या भूमिका प्रेक्षकांना सुखद धक्का देणार्‍या असतील. वेगळा लूक आणि तितकीच वेगळी व्यक्तिरेखा या तिघींनी ‘वायझेड’मध्ये साकारली आहे. आतापर्यंतचे सिनेमाचे टीझर्स पाहाता तो सागर आणि अक्षय या प्रमुख पुरुष कलाकारांचा सिनेमा वाटत असला, तरी तिघींच्या भूमिका सिनेमाचा फार महत्त्वाचा भाग आहे.’

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लुलियाचा सलमानवर कौतुकाचा वर्षाव!