Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘सैराट हवा’ कार्यक्रम रद्द

‘सैराट हवा’ कार्यक्रम रद्द
, सोमवार, 17 ऑक्टोबर 2016 (10:11 IST)
लातूरमध्ये ‘सैराट हवा’ नावाने होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. एका शाळेच्या मदतीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी क्रीडा संकुलावर मंच तयार करण्याचे काम सुरु होते. यासाठी बर्‍याच ठिकाणी खोदाखोद करण्यात आले होते. यागोष्टीला मैदानावर दररोज व्यायाम आणि सराव करणार्‍यांनी आक्षेप घेतला. आणि सर्वांनी मिळून काम बंद पाडले. त्यानंतर अखेर संयोजकांनी हा कार्यक्रमच रद्द करुन टाकला. या कार्यक्रमात आर्ची एक ट्रॅक्टर आणि बुलेट चालवणार होती. या दोन्हींचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावातून मिळणारे उत्पन्न शाळेसाठी निधी म्हणून दिला जाणार होता. जिल्हाधिकार्‍यांनीही हा कार्यक्रम कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करीत रद्द केला असल्याचे सांगीतले आहे. या कार्यक्रमात ‘चला हवा येऊ द्या’ची टीम आणि सैराट चित्रपटातील आर्ची आणि परशा सहभागी होणार होते. जोडीला शांताबाई फेम संजय लोंढे आणि लावणी सम्राज्ञी मेघा घाडगेही उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सर्वना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा