Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

105 वेळा सैराट पाहणारा एक अवलिया

105 वेळा सैराट पाहणारा एक अवलिया
पुणे- नागराज मुंजुळेच्या सैराटने फक्त महाराष्ट्राच नव्हे, तर देशभरातल्या सिनेरसिकांना वेड लावले. मात्र, त्यापैकी एक अवलिया असा ही आहे ज्याने दोन- तीन वेळा नव्हे तर तब्बल 105 वेळा सैराट चित्रपट पाहिला आहे.
 
या सैराटवेड्याचे नाव हनुमंत लोंढे असे आहे. लाँड्रीत काम करणार्‍या हनुमंतने सैराट प्रदर्शित झाल्यापासून सलग 105 दिवस 105 वेळा पाहिला आहे.20 एप्रिलपासून 11 ऑगस्टपर्यंत त्याने थिएयच्या अक्षरक्ष: वार्‍या केल्या. महत्वाचे म्हणजे सैराटच्या 105 शोची तिकिटंही त्याने स्तव:जवळ जपून ठेवली आहेत.
 
मूळचा सोलापूर जिल्ह्यातील 36 वर्षींय हनुमंतने पुण्यात येऊन लाँड्रीत काम करायला सुरुवात केली. चित्रपटाच्या वेडापायी त्याने सुरुवातीला चक्क ब्लॅकमध्येही तिकिट विकत घेतले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सलमानची बहीण अर्पिताच्या घरी दागिन्यांची चोरी