Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

22 जुलैला भेटीला येणार ‘अँड जरा हटके’!

22 जुलैला भेटीला येणार ‘अँड जरा हटके’!
, गुरूवार, 14 एप्रिल 2016 (12:34 IST)
अखेर प्रकाश कुंटे दिग्दर्शित आणि मिताली जोशी लिखित ‘अँड जरा हटके’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून हा चित्रपट येत्या 22 जुलैला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. एरॉस इंटरनॅशनलची प्रस्तुती असलेला हा चित्रपट म्हणजे आजच्या वेगवान जगातल्या बदलत्या नात्यांची कहाणी आहे. 
 
मृणाल कुलकर्णी, शिवानी रंगोले, सिद्धार्थ मेनन यांच्यासोबत इंद्रनील सेनगुप्ता हा हिंदीतला चेहरा या चित्रपटामधून पहिल्यांदाच मराठीमध्ये झळकणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव आणि इरॉसच्या क्रिशिका लुल्ला यांनी एकत्रितपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नात्यांची बदलती कहाणी मांडणारा हा चित्रपट म्हणजे मराठी चित्रपटामधला नवा प्रयोग मानला जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi