Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Abhidnya Bhave: अभिनेत्री अभिज्ञा भावे वर दुःखाचा डोंगर,जवळच्या व्यक्तीचे निधन

abhigya bhave
, रविवार, 3 सप्टेंबर 2023 (13:50 IST)
Instagram
मराठा मोळी अभिनेत्री अभिनेत्री अभिज्ञा भावेवर दुःखाचा डोंगर कोसळला असून तिच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झाले आहे. ही जवळची व्यक्ती तिची आजी प्रमिला भावे यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं आहे. तिने ही बातमी सोशलमिडीयावर आजीच्या सोबत असलेला फोटो टाकत शेअर केली आहे.  
 
तिने पोस्ट करून लिहिले, " माझ्या सर्वात खास आणि खोडकर मुलाला प्रेम तू 93 वर्षे आनंदात जगली, सर्वांवर तू भरभरून प्रेम केलं. आम्हा सर्वांना एकत्र केलंस, तुझं ते तेजस्वी हसणं, तुझ्या डोळ्यातील चमक, तुझी मिठी, माझा नेहमी पक्ष घेणारी माझी सर्वात मोठी चाहतीला मिस करेन "मी वचन देते मी तुझ्या आठवणी नेहमी जपून हृदयात ठेवेन. 
 
अभिनेत्री अभिज्ञा भावेने  खुलता कळी खुलेना, तुला पाहते रे, तु तेव्हा तशी अशा मराठी मालिकांमध्ये अभिनय केले आहे.सध्या अभिज्ञा आता बाते कुछ अनकही सी या हिंदी मालिकेत भूमिका साकारत आहे. 
अभिज्ञाच्या आजीच्या निधनावर तिचे फेन्स आणि अनेक कलाकार श्रद्धांजली वाहत आहे. 

Edited by - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shahrukh Khan: सुहानाच्या चित्रपटात दिसणार किंग खान! वडील-मुलगी ही जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार