अभिनेते सयाजी शिंदे आपल्या सामाजिक कार्यामुळे तसेच पर्यावरण संवर्धनाच काम करण्यामुळे चर्चेत असतात. झाडे वाचवण्याच्या मागे ते नेहमी उभे असतात. पुणे -बंगलोर महामार्गावर सध्या महामार्ग रुंदीकरणचे कार्य सुरु आहे. झाडांना कापू नये त्यासाठी सयाजी शिंदे हे स्वतः तासवड येथे गेले होते . त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे. त्यांना दुखापत झाली आहे. पुणे- बंगळूर महामार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. तेथील झाडांसाठी सयाजी शिंदे तासवडे येथे गेले होते. कत्तल करुन जी झाडे वाचली आहेत, त्या झाडांची शास्त्रीय पद्धतीने काटछाट करुन त्याचे पुनर्रोपण केलं पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.