Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वैभव मांगले यांच्या सोबत स्टेजवर नेमके काय झाले वाचा पूर्ण बातमी

actor vaibhav mangle
, शनिवार, 27 एप्रिल 2019 (10:24 IST)
'माझ्या प्रकृतीबाबत काही अफवा पसरत आहेत. पण तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका. माझी प्रकृती उत्तम आहे' असे अभिनेता वैभव मांगले यांनी व्हिडियो द्वारे त्यांच्या चाहत्यांना सांगितले असून लवकरच ते पुढील सर्व प्रयोग करणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले आहे.कोणत्याही प्रकारे माझी तब्येत खराब नसून मला हृदयविकाराचा झटका आला नाही केवळ थोडासा अशक्तपणा आहे. त्यामुळे चाहत्यांनी निश्चित राहावे असे मांगले यांनी स्पष्ट केले आहे.
 
वैभव यांना सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे अभिनित असलेले प्रसिद्ध असे अनातक अलबत्या गलबत्या प्रयोगादरम्यान वैभव मांगले रंगमंचावर अचानक कोसळले होते, त्यांना भोवळ आल्याने डोळ्यासमोर काळोक पसरल्याचे त्यांनी सांगितले आहे, तात्काळ नाटकाचा प्रयोग थांबवण्यात आला. सोबतच सांगली येथील 43 डिग्री अंश सेल्सिय तापमान, त्यात सभागृहात एसी  नाही त्यामुळे प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. त्यामुळे मला अशक्तपणा आला  आहे, मात्र  कुठलाही ह्रदयविकाराचा झटका आला नाही. आय अम फाईन, तुम्ही सर्वांनी जी काळजी दाखवली, विचारपूस केली, त्याबद्दल सर्वांचे आभार असे म्हणत, वैभव मांगलेंनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. वैभव मांगले हे मराठीतील प्रसिद्ध अभिनेते असून ते चित्रपट आणि नाटकात काम करतात. त्यांचे अनेक सिनेमे हिट असून त्यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एवेंजर्सची भारतात क्रेझ