अभिनेत्री केतकी चितळे नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत सापडते. आता तिने एक व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे ती पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
केतकीने आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात केतकीने न्यू इयर पार्टीचं सेलिब्रेशन केले असून त्यात ''माफ करा पण कधीही विसरू नका' म्हणत ती दारू पिताना दिसली आहे. तसेच तिने ''मै कट्टर सनातन हिंदू हूं .. लेकिन इसका मतलब ये नही की बाकी सब 100 टक्के गलत है.'' असे कॅप्शन लिहिले आहे.
सध्या तो व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरु केले आहे.एकाने म्हटले आहे की, वाह दीदी लोकांना इंग्रजी परम्परा पाळू नका सांगायचं आणि स्वतःढोसायची. त्यावर केतकीने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. केतकी म्हणाली मी कधी असे म्हणाले की इंग्रजी परंपरा पाळू नका.? सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात ही दारू आहे. आपले देव देखील दारू पितात. काळी मातेला देखील दारूचं नैवेद्य दिला जातो. काही शंकराच्या मंदिरात देखील मदिरा चढवतात. स्वतःची संस्कृती शिका हे नेहमी सांगते आणि तसे लिहिते देखील. फरक शिका. या वर नेटकऱ्याने माघार घेत दोन्ही हात जोडले.