Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुष्कर श्रोत्रीच्या 'उबुंटू' चे अमिताभकडून कौतुक

amitabh bachhan
, गुरूवार, 7 सप्टेंबर 2017 (09:22 IST)

अभिनेता पुष्कर श्रोत्रीचे  दिग्दर्शक असलेल्या 'उबुंटू'   या सिनेमाचे   अमिताभ बच्चन हेसुद्धा उंबुटू या सिनेमाचा ट्रेलर पाहून भारावून गेले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी उंबुटू या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. “भारतीय सिनेमा कात टाकतो आहे आणि दिवसेंदिवस विविध चांगले विषय तसंच कथा सिनेमाच्या माध्यमातून हाताळल्या जात आहेत.त्यामुळे उंबुटू या मराठी सिनेमाचा ट्रेलर जरुर पाहा” अशी पोस्ट बिग बी अमिताभ बच्चन यांनी केली आहे. 

त्यानंतर  “माझ्यासाख्या नवख्या आणि दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरु करु पाहणा-याला भारतीय चित्रपटसृष्टीच्या शहेनशाहचे अशाप्रकारे आशीर्वाद मिळणे हे मी माझं भाग्य समजतो. माझी नम्र आणि मनापासून इच्छा आहे की बिग बींना उंबुटू हा सिनेमा पाहण्यासाठी वेळ मिळावा”, अशा शब्दांत पुष्करने सोशल मीडियावर बिग बींच्या कौतुकाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. उंबुटू हा सिनेमा 15 सप्टेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे. शाळेसाठी जिद्दीने लढणा-या मुलांची गोष्ट सांगणारा उंबुटू हा सिनेमा आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘तुम्हारी सुलू’ चे पहिले पोस्टर प्रदर्शित