Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 13 March 2025
webdunia

अभिनेत्री अर्चना नेवरेकर आणि सख्यांनी साजरा केला पारंपरिक भोंडला ...

अभिनेत्री अर्चना नेवरेकर आणि सख्यांनी साजरा केला पारंपरिक भोंडला ...
, बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (18:04 IST)
मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री व इतर क्षेत्रातील सख्यांनी मिळून साजरा केला पारंपरिक भोंडला . अभिनेत्री अर्चना नेवरेकर व लीना नांदगावकर यांनी मिळून या भोंडल्याची आयोजन केले . कोरोना काळात भेटीगाठी थांबल्या होत्या पण आता हळू हळू परिस्थती पूर्वपदावर येत आहे .

नवरात्रीचे औचित्य साधत या सख्यांनी भोंडला कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला . या कार्यक्रमाला अर्चना  नेवरेकर, लीना नांदगावकर ,सुप्रिया  पाठारे ,शिल्पा नवलकर ,नियती राजवाडे ,अदिती सारंगधर ,वनश्री पांडे ,
मानसी नाईक , मेघा धाडे , पल्लवी  प्रधान ,सुलेखा  तळवलकर ,रोहिणी  निनावे , कांचन अधिकारी,नितु  जोशी ,
डॉ पूर्णिमा म्हात्रे ,रेखा  सहाय ,वनिता  कुंभारे ,सोनल  खानोलकर उपस्थित होते , या निमित्ताने नुकतेच लग्न झालेल्या अभिनेत्री  मानसी नाईक खरेरा  चे गोड कौतुक करून ओटी भरण्यात आली .अंधेरी पश्चिम मधील 'नैवेद्य' या महाराष्ट्रीयन रेस्टोरंट मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला .

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'बाबू'मध्ये पाहायला मिळणार ॲक्शनचा तडका