Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आशिषचा खलनायकी अंदाज

आशिषचा खलनायकी अंदाज
, गुरूवार, 5 डिसेंबर 2019 (14:48 IST)
'बंडू' नाव उच्चरताच एक ओळखीचा चेहरा डोळ्यांसमोर येतो आणि आपल्या चेहऱ्यावर नकळतपणे हास्य फुलवून जातो. हे हास्य फुलवणारा चेहरा म्हणजे आशिष पवार. संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या विनोदी भूमिकांमुळे प्रसिद्ध असणारे आशिष पवार लवकरच 'सिनियर सिटीझन' चित्रपटात दिसणार आहेत. आशिष 'सिनियर सिटीझन' चित्रपटात एका खलनायकाची भूमिका साकारत आहे. आपल्या चौकटीबाहेर जाऊन त्यांनी पहिल्यांदाच खलनायक साकारला आहे. त्यांच्या या भूमिकेबद्दल आशिष सांगतात, "एक कलाकार असल्याने माझा नेहमीच विविध भूमिका साकारण्याचा अट्टहास असतो. माझी आणि दिग्दर्शक अजय फणसेकरांची जुनी ओळख आहे. पूर्वी आम्ही दोघांनी एका हिंदी चित्रपटासाठी सोबत काम केले होते. काही तांत्रिक कारणांमुळे तो सिनेमा नाही होऊ शकला, मात्र आमची मैत्री पक्की झाली. जेव्हा मला अजय सरांनी या भूमिकेबद्दल सांगितले तेव्हा मला आनंद झाला. चित्रपटात मी पहिल्यांदा खलनायक साकारला असला तरी बऱ्याच चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये मी गंभीर भूमिका केल्या आहेत. माझ्या या भूमिकांना प्रेक्षकांनी तर पसंत केलेच, परंतु या सर्व भूमिका मला पारितोषिके सुद्धा देऊन गेल्या. एक कलाकार म्हणून मी स्वतःला कोणत्याही चौकटीत बांधून ठेवले नाहीये.  विनोदाला पूर्ण बाजूला ठेऊन मी 'हा' खलनायक रंगवला आहे. त्यासाठी मी स्वतःच्या देहबोलीमध्ये आणि आवाजामध्ये बरेच बदल केले. अजय सरांनी देखील मला ही भूमिका साकारण्यासाठी पूर्ण मोकळीक दिली होती. अजय सर आणि आमच्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा मी खूप ऋणी आहे कारण या सगळ्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच मी ही भूमिका साकारू शकलो. २०१९ वर्षाचा शेवट माझ्यासाठी खूपच सुखद ठरणार आहे. एकीकडे माझ्या एका विनोदी नाटकासाठी मी सलग पाच पुरस्कार पटकावले तर दुसरीकडे मी पहिल्यांदाच ज्या सिनेमात खलनायक साकारला आहे. तो सिनेमा प्रदर्शित होत आहे. माझ्या विनोदी भूमिकांमुळे मला नवीन ओळख मिळाली आहे. ती ओळख तशीच ठेवत मला अशा भूमिकांसाठी सुद्धा ओळख मिळवायची आहे."
webdunia
'सिनियर सिटीझन' हा चित्रपट येत्या १३ डिसेंबरला प्रदर्शित होत असून या सिनेमाचे दिग्दर्शन अजय फणसेकर यांनी केले आहे. मोहन जोशी निवृत्त लष्कर अधिकारी अभय देशपांडे यांची भूमिका साकारताना दिसणार असून या चित्रपटात स्मिता जयकर, सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया, किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार, आशिष पवार, कमलेश सावंत या  चित्रपटात दिसणार आहेत. माधुरी नागानंद आणि विजयकुमार नारंग निर्मित 'सिनियर सिटीझन' या चित्रपटात क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून राजू सावला यांनी तर एक्झिक्टिव्ह प्रोड्युसर म्हणून प्रमोद सुरेश मोहिते यांनी काम पहिले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रणवीरमुळे राणी मुखर्जी झाली ट्रोल