Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजनीतीच आपल्याला आयुष्यात एक सुखी व समाधानी जीवन देऊ शकते ... अश्विनी नांदेडकर

राजनीतीच आपल्याला आयुष्यात एक सुखी व समाधानी जीवन देऊ शकते ... अश्विनी नांदेडकर
, शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018 (12:49 IST)
कोण म्हणतं पॉलिटिक्स साठी पैसाच लागतो ... तुषार माझ्या सहभागीने थिएटर ऑफ रेलेवन्सच्या प्रक्रियेद्वारे हे अनुभवले आणि दाखवले की राजनीतीमध्ये पुढाकार घेण्यासाठी पैसे नाही तुमची इच्छा आणि उद्देश्य स्पष्ट हवा . . "राजनीती शुद्ध आणि पवित्र असते " या मंजूल भारद्वाज यांच्या तत्वाला उद्देश्य ठरवून तुषार आणि स्वाती यांनी मालाड मध्ये राजनैतिक चिंतन रॅली काढली ... त्याच्या या मोहिमेला सुरवात होण्याअगोदर त्याने आम्हा थिएटर ऑफ रेलेवन्सच्या कर्मीना share केले ... त्यावेळी सुरवातीला आश्चर्य वाटले ... कारण जो तुषार आमच्यासोबत परफॉर्म करताना चाचपडत होता ... एकेक शब्दासाठी दहादा ओरडा खात होता ... कोणतेही जबाबदारीचे काम त्याच्यावर टाकताना त्याचा नंबर शेवटी होता ... पण थिएटर ऑफ रेलेवन्सच्या फेस्टिवल पासून त्याची अफलातून growth जाणवायला लागली ... एकेका गोष्टीवर तत्वांवर त्याची पकड मजबूत व्हायला लागली ... आणि थिएटर ऑफ रेलेवन्सच्या प्रक्रियेला त्याने घट्ट पकडून ठेवले ... या आयुष्य देणाऱ्या प्रक्रियेला त्याने आयुष्यात प्रत्यक्ष उतरवायला सुरवात केली ... लिखाण, त्याचा कामातला चिवटपणा, आणि मंजूल सरांचे मार्गदर्शन यामुळे या हिऱ्याला पैलू पडायला सुरुवात झाली ... आपला प्रत्येक अनुभवाची नोंद लिखाणात ठेवली ... प्रत्येक काम पेंडिंग न ठेवता पूर्णत्वाला नेले ... आणि सर्वात मोठा पुढाकार म्हणजे राजनैतिक चिंतन रॅली ... फक्त दोन बॅनर ...सोबतीला सहभागी स्वाती ... ठरवले की मालाड स्टेशन पर्यंत रॅली काढायची आणि जनमानसांत राजनीतीचा खरा अर्थ पोहोचवायचा.. आपल्या मित्रांशी, राजकारणात इंटरेस्ट असणाऱ्या माणसांशी बोलायला सुरुवात केली ...आपले ध्येय सांगायला सुरुवात केली ... आणि ध्येयाशी लोकांना जोडायला सुरवात केली ... आज राजकारणात असलेल्या काही स्वार्थीलोलुप व्यक्तींमुळे राजनीती ला अर्थहीन बनवणे सुरू झाले आहे .. सुविद्य सज्ञान लोक याकडे पाठ फिरवतात ...this is not my cup of tea म्हणत सरळ सरळ या ignore करतात आणि राजनीतीला एक जंजाळ बनवायला प्रवृत्त करतात ज्यात ते स्वतः कधी फसतात हे कळतही नाही ... म्हणूनच आता वेळ आली आहे की प्रत्येक नागरिकाने राजनीतीचा खरा अर्थ आणि तिची पवित्रता समजून घेणे ... कारण ही राजनीतीच असते जी आपल्याला आयुष्यात एक सुखी आणि समाधानी जीवन देऊ शकते ... पोलीस परमिशन पासून सगळे सोपस्कार करत त्याने आपल्या ध्येयाला पूर्णत्व दिले सकाळी 7.30 ला आपले बॅनर आणि सहभागीनना सोबत घेऊन राजनीतीची खरी व्याख्या वाचत ...

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सलग दुसऱ्या वर्षी स्वप्नील बनला ‘मॅक्स’क्लोथिंगचा ब्रॅण्ड़ अॅम्बेसिडर