बिग बॉस हिंदीच्या १४ व्या पर्वातही रुबीना दिलैक आणि तिचा पती अभिनव शुक्ला यांनी यांनी हे दाखवून दिलं. घटस्फोटापर्यंत आलेलं नात बिग बॉसच्या घरामुळं पुन्हा बहरलं. हेच अविष्कार आणि स्नेहाच्या बाबतीत दिसणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
काल पार पडलेल्या बिग बॉसच्या चावडीवर अनेक किस्से घडले. महेश मांजरेकरांनी अविष्कारला सर्वात कमकूवत खेळाडू म्हटलं. तर पाच लाख रुपये घेऊन हा खेळ सोडण्याची ऑफर त्यांनी सर्व स्पर्धकांना दिली होती. यातही अविष्कारनं ती ऑफर स्वीकारल्यानं त्याला मांजरेकरांनी सुनावलं.
हे सर्व घडल्यानंतर अविष्कार दुखावल्याचं पाहायला मिळालं. तो रडताना दिसतोय.सुरेखा त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर अविष्कार स्नेहाला मिठी मारत सॉरी बोलताना दिसतोय. असा हा प्रोमो सध्या चर्चेत आला आहे. त्यामुळं या दोघांच्या नात्याची नवी सुरुवात बिग बॉसच्या घरात होणार का?, अशी चर्चा सध्या सुरू आहे.