Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'ब्ल्यू जीन ब्लुस' दाखवणार नैराश्यातून उत्साहाकडे जाण्याचा मार्ग

'ब्ल्यू जीन ब्लुस' दाखवणार नैराश्यातून उत्साहाकडे जाण्याचा मार्ग
, रविवार, 19 फेब्रुवारी 2017 (20:28 IST)
टेक्नोसेव्हीच्या या जगात आजची तरुणाई गतिमान झाली आहे, वाढत्या अपेक्षा आणि आशांना तात्काळ गवसणी घालण्याचे स्वप्न बाळगणारी ही तरुणाई लवकर नैराश्यात देखील जाऊ शकते. खास करून, नातेसंबंधांतून आलेल्या नैराश्यातून तरुणवर्ग वैफल्यग्रस्त झालेला दिसून येतो. अशा वैफल्य झालेल्या तरुणाची कथा 'ब्ल्यू जीन ब्लूज'' ह्या आगामी चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे.  डॉ. नितीन महाजन दिग्दर्शित हा सिनेमा आजच्या तरुणाईच्या मानसिकतेचा वेध घेणारा आहे. महत्वाचे म्हणजे, दिवगंत नायिका अश्विनी एकबोटे हिचा अखेरचा चित्रपट म्हणून देखील या सिनेमाकडे पहिले जात आहे. नैराश्याकडे वळलेल्या एका तरुणाभोवती ह्या सिनेमाची कथा जरी फिरत असली तरी यात, अश्विनी एकबोटे यांची व्यक्तिरेखा मनाला चटका लावून जाणारी आहे.
 
डॉ. नितीन महाजन यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनासोबतच लेखक आणि निर्मात्याची धुरा देखील सांभाळली आहे. ह्या सिनेमाबद्दल आपले मत व्यक्त करताना ते सांगतात की. 'मानवी जीवनातील हे चढ-उतार या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आयुष्यात मनाविरुद्ध काही गोष्टी घडू लागल्या की आपण दुखावतो. मनाचे हे दुखणे शारीरिक दुख्ण्यापेक्षा अधिक गंभीर असू शकतं, कारण याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर आणि त्यासोबतच मानसिकतेवर पडत असतो. अशावेळी कोणतेही अनुचित पाऊले उचलण्याआधी स्वतःला थोडा वेळ देत, आणि सल्लागारांच्या मदतीने आलेले नैराश्य टाळता येऊ शकते'. तसेच आजची तरुणपिढी याच नैराश्यातून जात असून, हा सिनेमा अशा वैफल्यग्रस्त झालेल्या युवकांना स्फुरण देणारा ठरेल, असेही ते पुढे म्हणतात.
 
या सिनेमात राज ठाकूर, श्वेता बीस्ट, डॉ. संजीवकुमार पाटील, राधिका देशमुख आणि अश्विनी एकबोटे यांच्या देखील प्रमुख भूमिका आहे. विशेष म्हणजे या सिनेमाला विविध आंतरराष्ट्रीय आणि आंतरदेशीय चित्रपट महोत्सवांमध्ये नावाजण्यात आले आहे. गतवर्षी मेक्सिको येथे झालेल्या सिने पोर्ब फिल्म फेस्टिवलमध्ये या सिनेमाला बेस्ट सेल्फ फंडेड चा किताब मिळाला होता, तसेच बार्सेलोना प्लेनेट, मियामी, लॉस एंजेलेस सिनेफेस्ट यांसारख्या अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये हा सिनेमा दाखवण्यात आला असून, 'ब्ल्यू जीन ब्लुस' ला चांगला प्रतिसाददेखील मिळाला आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाक एक्ट्रेसने सलमानचा उडवला मजाक, म्हटले 'छिछोरा आहे सलमान'