Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रत्नागिरी : बालकलाकार साईशा भोईरच्या आईला अटक; ११लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी अटक

रत्नागिरी : बालकलाकार साईशा भोईरच्या आईला अटक; ११लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी अटक
, बुधवार, 26 जुलै 2023 (08:45 IST)
social media
रंग माझा वेगळा, ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या मराठी बालकलाकाराच्या आईला फसवणूक प्रकरणातArrested by Ratnagiri Policeकरण्यात आल़ी पूजा भोईर असे या महिलेचे नाव आह़े रत्नागिरीतील महिलेची 11 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा पूजा हिच्याविरूद्ध दाखल करण्यात आला होत़ा
 
दरम्यान पूजा हिच्याविरूद्ध फसवणुकीचे राज्यभरातील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आह़े नुकतेच तिला नाशिक व मुंबई पोलिसांकडून अशाच एका फसवणूकीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होत़ी. मुंबईतूनच पूजा भाईर हिला रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली होत़ी   मंगळवारी तिला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता 25 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर तिची मुक्तता करण्यात आल़ी. भोईर हिच्यावतीने ॲड मनिष नलावडे व ॲड तनया सावंत यांनी युक्तिवाद केल़ा
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूजाने अल्गो ट्रेडिंग नावाची कंपनी स्थापन केली होत़ी या कंपनीत गुंतवणूक करून आर्थिक लाभाचे आमिष पूजा ही दाखवत होत़ी यासाठी लोकांकडून तिने मोठ्या पमाणावर पैसे स्वीकारले होत़े मात्र कालांतरने पैसे स्वीकारून पूजा ही फसवणूक करत असल्याची माहिती समोर आली 11 लाख रुपये स्वीकारले होत़े मात्र ही रक्कम पूजाने महिलेला परत केली नव्हत़ी दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने पूजा हिच्याविरूद्ध रत्नागिरी पोलिसांत तक्रार दाखल केली होत़ी फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या पूजा हिचा रत्नागिरी पोलिसांकडून शोध घेण्यात येत होत़ा याचदरम्यान पूजा हिच्याविरूद्ध राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आल़ी तसेच पूजा हिला नाशिक व मुंबई पोलिसांकडून देखील अटक केल्याची माहिती रत्नागिरी पोलिसांना मिळाल़ी  फसवणुकीच्या गुन्हा दाखल असल्याने रत्नागिरी पोलिसांकडून पूजा हिला मुंबई येथून अटक करण्यात आल़ी.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Dream Girl 2: 'ड्रीम गर्ल' समोर आली,ड्रीम गर्ल 2 चे फर्स्ट लूक रिलीज