काही चित्रपटअजरामर होऊन जातात. अनेक वर्षानंतर देखील हे चित्रपट पाहिल्यावर नवे वाटतात महेश कोठारे दिगदर्शित झपाटलेला चित्रपट १६ एप्रिल १९९३ रोजी प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला 30 वर्षे पूर्ण झाले.महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे या धमाल जोडीचा कमाल चित्रपट म्हणजे 'झपाटलेला'. या चित्रपटाने कित्येक पिढ्यांचे मनोरंजन केले आहे. या चित्रपटातील तात्या विंचू हा बाहुला अजरामर झाला. या चित्रपटात महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, किशोरी आंबिये, विजय चव्हाण, मधु कांबिकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.मराठी सिनेमात बोलक्या बाहुल्याचा प्रयोग पहिल्यांदाच या चित्रपटातून करण्यात आला.
या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केले होते.तर रामदास पाध्ये यांनी या बोलक्या बाहुल्यांचा खेळ यशस्वी केला. या चित्रपटातील कलाकारांप्रमाणेच तात्या विंचू, आवडी आणि अर्धवटराव हे तीन बाहुले कायमचे लोकांचे मनात घर करून गेले.आजतायागत हा चित्रपट लोकांचा आठवणीत जागृत आहे.