मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध रंगकर्मी आणि अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे निधन झाले आहे. पुणे येथील भरत नाट्यमंदिरात प्रयोग सुरु असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झालेआहे. प्रयोग सुरु असतानाच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला . त्यानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते , डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे . त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर आणि रंगभूमीवर शोकळला पसरली आहे.
पुण्यातील भरत नाट्यमंदिरात ‘नाट्यत्रिविधा’ या नाटकाचा प्रयोग सुरु असतानाच अश्विनी एकबोटे यांना मृत्यू झाला आहे. एका नाटकाच्या प्रयोगातील गाण्यावर त्यांनी नृत्य सादर केले होते. रात्री ८ च्या सुमारास त्या कार्यक्रमातील शेवटचे नृत्य सादर करण्यासाठी रंगमंचावर आल्या होत्या . भैरवी रागावर आधारित बंदिशीवर त्यांनी नृत्य करण्यास सुरुवात केली होती मात्र त्यांच्या या सहजसुंदर नृत्याला प्रेक्षकांनीही दाद दिली मात्र नशिबी वेगळे लिहिले होते नृत्य सादर करुन झाल्यावर त्या अखेरच्या क्षणी तोल जाऊन रंगमंचावर कोसळल्या होत्या . त्यांनी त्वरित पेरुगेटजवळील गोरे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. मराठीतीतील उत्तम अभेनेत्री गमवलेआहे असे मत सर्वांनी व्यक्त केले आहे.