rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॅनी सिंग गाणार मराठी रॅप

danni singh
, बुधवार, 25 जानेवारी 2017 (14:58 IST)
यो यो हनिसिंग, बादशाह, रफ्तार ह्या टॉपमोस्ट ‘रॅपर्स’ची आजच्या युवा पिढींमध्ये जास्त क्रेज पाहायला मिळते आहे. पाश्चिमात्य देशातून आलेला ‘रॅप’ गाण्यांचा हा प्रकार आपल्या भारतात हिट होताना दिसत आहे. आजच्या इंग्रजाळलेल्या संस्कृतीला लागलेले रॅपसॉंगचे हे वेड मराठीतही येऊ घातले आहे. विशेष म्हणजे, नवनवीन प्रयोग आणि संकल्पना आत्मसात करण्यात नेहमीच तत्पर असलेल्या आपल्या मराठी इंडस्ट्रीतदेखील रॅपिंगचा हा फंडा चांगलाच गाजतो  आहे.

मराठीत सध्या गाजत असलेले ‘आयटमगिरी’ हे रॅपसॉंग त्यातलेच एक म्हणावे लागेल. डॅनी सिंग याने गायलेले हे रॅपसॉंग तरुणाईला ठेका धरण्यास भाग पाडत आहे. मराठी- हिंदी फ्युजन असलेले हे गाणे, प्रत्येकाच्या होठावर चांगलेच रुळलेले दिसून येत असून, ‘आयटमगिरी’ या विडीयो सॉंगच्या निमित्ताने मराठीत रॅपसॉंगचा नवा ट्रेंड रुजू झाला आहे. अर्थात यापूर्वी मराठीच्या काही पॉप गाण्यांमध्ये याचा वापर केला असला तरी, एक संपूर्ण गाणे ‘रॅप’ मध्ये गाण्याचा हा पहिलाच प्रयोग करण्यात आला आहे. एस. के. व्हिजन्स निर्मित आणि इंद्रनील नुकडे दिग्दर्शित या रॅपसॉंगला आशिष किशोर यांनी ताल दिला आहे. शिवाय हे गाणे अधिक रेखीव दिसण्यासाठी सहदिग्दर्शक ऐश्वर्या जैन आणि स्नेहल उभे यांनी विशेष मेहनत घेतली आहे. बेचलर्सना भुरळ पाडणा-या या रॅपसॉंगला नेटीजन्सकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, हे सॉंग लवकरच प्रसिद्धीचा उच्चांक गाठेल, यात शंका नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निशिकांत कामत साकारणार ‘फुगे’ चा खलनायक