Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'दे धक्का २' सिनेमाचे ट्रेलर आणि संगीत लाँच !

de dhakka 2
, गुरूवार, 21 जुलै 2022 (20:31 IST)
अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत  'दे धक्का २'  चित्रपटाचे संगीत आणि ट्रेलरचे अनावरण शानदार सोहळ्यात संपन्न झाले.
 
काही चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडत नाहीत तर चाहत्यांच्या मनावरही छाप पाडण्यात यशस्वी होतात असाच एक चित्रपट ‘दे धक्का’. या चित्रपटाला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले आणि आता या चित्रपटाचा सिक्वेल "दे धक्का २ " ५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडिया वर रिलीज झाला आणि त्याला रसिक प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला, अल्पावधीत २ मिलियन हुन अधिक व्युज टिझर ला मिळाले . 
 
सुपरहिट 'दे धक्का ' २००८ साली प्रदर्शित झाला होता. अतुल काळे आणि सुदेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शिन केले होते. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, संजय खापरे आणि सक्षम कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट महाराष्ट्रातील एका खेडेगावातील एका वेड्या कुटुंबाच्या ऑटो-रिक्षामधील प्रवासाविषयी होता.
 
आता दे धक्का २ मध्ये ऑटो-रिक्षाची जागा कार ने घेतली आहे आणि चित्रपटाचे कथानक  लंडनमध्ये घडते. या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सक्षम कुलकर्णी , संजय खापरे तसेच सह कलाकार गौरी इंगवले, प्रवीण तरडे, विद्याधर जोशी आणि आनंद इंगळे हे आहेत .  
 
दे धक्का 2 चे दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केले आहे. महेश मांजरेकर यांनी कथा आणि पटकथा लिहिली आहे , संवाद लेखन गणेश मतकरी यांनी केले आहे. करण रावत हे सिनेमॅटोग्राफर आहेत तसेच चित्रपटाचे एडिटिंग सतीश पडवळ आणि नीलेश गावंड यांनी केले आहे.
 
दे धक्का २ मधील गाणी संगीतकार हितेश मोडक यांनी संगीतबद्ध केली आहेत तर गीतकार मंदार चोळकर आणि नेहा शितोळे हे आहेत.आघाडीचे गायक अवधूत गुप्ते, वैशाली माडे, शमिका भिडे, रिया भट्टाचार्य या चित्रपटाला लाभले आहे . सिनेमाचे संगीत 'व्हिडिओ पॅलेस' ने प्रदर्शित केले आहेत. 
 
' दे धक्का २ ' च्या संगीत आणि ट्रेलर लाँचच्या दिमाखदार कार्यक्रमात अमेय खोपकर यांनी "फिल्मास्त्र स्टुडिओज" या त्यांच्या नवीन चित्रपट वितरण कंपनीच्या लोगो चे अनावरण अमोल कागणे आणि प्रणित वायकर यांच्या सह केले . 
 
'दे धक्का २' ची निर्मिती यतीन जाधव आणि स्वाती खोपकर यांनी केली आहे. निनाद नंदकुमार बत्तीन आणि तबरेझ पटेल यांनी सह निर्मिती केली आहे तसेच असोसिएट निर्माते कर्मिका टंडन आणि विशिष्टा दुसेजा हे आहेत .
 
'दे धक्का २' हा चित्रपट ५ ऑगस्ट २०२२  रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Me Punha Yein-‘मी पुन्हा येईन’मध्ये दिसणार राजकारणाची अस्पष्ट बाजू