Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'प्रेमवारी' तील 'तू ऑनलाईन ये ना' गाणे प्रदर्शित

'प्रेमवारी' तील 'तू ऑनलाईन ये ना' गाणे प्रदर्शित
, बुधवार, 23 जानेवारी 2019 (11:07 IST)
प्रेमाची परिभाषा सांगणाऱ्या 'प्रेमवारी' या चित्रपटातील 'तू ऑनलाईन ये ना' हे आयटम सॉंग नुकतेच प्रदर्शित झाले. रसिकप्रेक्षकांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणाऱ्या मीरा जोशी हिच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले असून या गाण्यात तिची एन्ट्री जेसीबी मधून होताना दिसतेय. या जल्लोषमय गाण्याचे चित्रीकरण कोपरगावनजीक वारी या गावात झाले. दोन रात्रींमध्ये चित्रित करण्यात आलेल्या या उत्स्फूर्त गाण्याचे बोल गुरु ठाकूर यांचे असून, अमितराज यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तर वैशाली सावंत यांच्या आवाजात हे उडत्या चालीचे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सुजित कुमार असून प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
 
प्रेम म्हणजे त्याग, समर्पण. प्रेमाचे एक अनोखे रूप या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चिन्मय उदगीरकर, मयुरी कापडणे, अभिजित चव्हाण, भारत गणेशपुरे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ या चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून,प्रस्तुतीही त्यांचीच आहे. प्रेमाचे महत्व अधोरेखित करणारा हा चित्रपट प्रेमाच्या महिन्यात अर्थात ८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उरीचा तमिळ, तेलुगु आणि मल्‍याळममध्‍ये रिमेक येणार