Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 4 April 2025
webdunia

अवधूत म्हणतो 'गॅटमॅट होऊ देना'

Gatmat Hou Den
, मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018 (00:07 IST)
मराठी सिनेसृष्टीत रॉकिंग गाण्यांसाठी ओळखले जाणारे अवधूत गुप्ते,यांचं एक नवकोरं गाणं नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच झालं आहे. 'गॅटमॅट होऊ देना' असं या गाण्याचे बोल असून, तरुणांचा आवाज अशी ख्याती मिरवणाऱ्या अवधुतच्या आवाजातील हे गाणं कॉलेज तरुणांना अक्षरशः खूळ लावत आहे. युथला आपल्या तालावर थिरकवणारं हे रॉक गाणं आगामी 'गॅटमॅट' चित्रपटाचे शीर्षकगीत असून, येत्या १६ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. शिवाय, बऱ्याच वर्षानंतर अवधूत 'गॅटमॅट' च्या निमित्ताने ऑनस्क्रीन झळकणार असल्याकारणामुळे, त्याच्या चाहत्यांसाठी हे गाणे खऱ्या अर्थाने रॉकिंग ठरत आहे. 
 
सचिन पाठक लिखित ‘गॅटमॅट होऊ देना’ या उडत्या लयीच्या गाण्याला समीर साप्तीस्करने चाल दिली असून,  अवधूतने ते त्याच्या 'स्टाईल'ने पडद्यामागे आणि पडद्यावरही गायलं आहे. कॉलेज विश्वातील सळसळत्या तरुणाईला आकर्षित करणारं हे गाणं साऱ्यांनाच स्फूर्ती देऊन जातं. प्रेमाची गुलाबी छटा एका नव्या ढंगात मांडणारा 'गॅटमॅट' हा सिनेमा प्रेमीजोडप्यांसाठी खास असणार आहे. अवधुत गुप्ते यांची प्रस्तुती आणि यशराज इंडस्ट्रीज यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन निशीथ श्रीवास्तव यांनी केले आहे. तसेच राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव यांनी या सिनेमाच्या निर्मात्याची धुरा सांभाळली असून तरुणाईने बहरलेल्या या सिनेमात अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे हे मराठितील युवा कलाकार आपल्याला पहायला मिळणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अंकिता लोखंडेच्या हॉट अदांनी केली धूम, फोटो झाले वायरल