'गर्ल्स' या चित्रपटाचे बोल्ड असे कॅरेक्टर पोस्टर लाँच झाल्यानंतर पोस्टरमधील 'या' तीन मुली हळू हळू प्रेक्षकांसमोर येऊ लागल्या आहेत. 'मती' आणि 'मॅगी' या दोन व्यक्तिरेखा समोर आल्यानंतर 'रुमी' म्हणजेच अन्विता फलटणकर ही तिसरी 'गर्ल'ही समोर आली आहे.
'रुमी'चा शोध खरंतर पटकन लागला. 'रुमी' कशी सापडली, याबद्दल विशाल देवरुखकर सांगतात, ''रुमीच्या भूमिकेसाठी आम्ही गोबरे गाल असणाऱ्या हेल्दी मुलीच्या शोधात होतो. परंतु ऑडिशन घेऊनही मनासारखी 'रुमी' सापडत नव्हती. तेव्हाच मला अन्विता आठवली. अन्विताचे 'टाईमपास'मधील काम मी पहिले होते. त्यामुळे मी तिला ऑडिशनला बोलवले आणि पहिल्याच फटक्यात 'रुमी'च्या भूमिकेसाठी आम्ही अन्विताची निवड केली. मी असे म्हणेन की बाकीच्या दोन 'गर्ल्स'पेक्षा 'रुमी' आम्हाला सहज सापडली. माझ्या डोक्यात 'रुमी'ची जशी प्रतिमा होती तशीच अन्विता आहे. मुख्य म्हणजे 'रुमी'आणि अन्वितामध्ये खूप साम्य आहे. त्यामुळे अन्वितालाही 'रुमी' साकारणे सोपे गेले.''
या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी लेखन केले आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि कायरा कुमार क्रिएशन्स प्रस्तुत 'गर्ल्स' हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 'अ कायरा कुमार क्रिएशन्स प्रॉडक्शनच्या अंतर्गत 'गर्ल्स' या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार यांची असून, अमित भानुशाली यांनी सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले आहे.