Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रिले सिंगिंगच्या माध्यमातून गिनीज बुकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करणारा मराठी सिनेमा- डॉ. तात्या लहाने

रिले सिंगिंगच्या माध्यमातून गिनीज बुकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करणारा मराठी सिनेमा- डॉ. तात्या लहाने
भारतीय चित्रपट सृष्टीत रिले सिंगिंग होण्याची ही पहिलीच वेळ आहे. रिले सिंगिंग या प्रकारात एका पेक्षा अधिक गायक एकत्र येऊन गाणं गातात. एकाच सूरात, लयीत गाताना गाण्यातील एक शब्द फक्त एक गायक गातो. रिले सिंगिंग यापूर्वी २००६ मध्ये युनायटेड किंगडम मधील जॉन बॅल स्कुलमध्ये २८८ विद्यार्थ्यांनी एकत्र येत गाणं गाऊन वर्ल्ड रेकॉर्ड केला होता, त्याचप्रमाणे २०१४ मध्ये संतोष रुंगटा इन्स्टिट्यूट, राजस्थान मध्येही रेकॉर्ड झाला. मात्र रिले सिंगिंग भारतीय चित्रपट सृष्टीत पहिल्यांदाच होणार आहे. विशेष म्हणजे असा धाडसी प्रयोग मराठी सिनेमात होणार असल्याने त्याबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. विराग मधूमालती वानखडे यांनी हा प्रयोग यशस्वी करण्याचं शिवधनुष्य पेललं आहे. रिले सिंगिंगच्या प्रयोगाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी विराग प्रयत्नात आहेत. त्यांनी नेहमीच आडवाटा निवडून स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलं आहे. नेत्रदान मोहिमेसाठी त्यांनी १०० दिवस डोळ्यांवर पट्टी बांधण्याचा देखील विक्रमी उपक्रम केला होता.  कलर्स वाहिनीवर "गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अब तोडेगा इंडिया" या रियालिटी शोच्या माध्यमातून १५५ तबला वादकांसोबत सातत्याने दीड मिनिटं एकाच सूरात तबला वादनाचा  रेकॉर्ड त्यांनी केला आहे. या तबला वादनाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्याने आता रिले सिंगिंग देखील यशस्वी होईल असा त्यांना ठाम विश्वास आहे. या उपक्रमासाठी सध्या मुंबईत ऑडिशन्स सुरु आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या शेवट पर्यंत त्या सुरु राहतील. आतापर्यंत ५०० उत्स्फूर्त स्पर्धकांनी या उपक्रमासाठी ऑडिशन्स दिल्या आहे. मुंबईत होत असलेल्या आणि पुणे नाशिक सोबत मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात होणाऱ्या ऑडिशन्स मधून निवडक ३०० गायक या कलाकृतीचे साक्षीदार होणार आहेत.

webdunia
'चक दे' प्रॉडक्शन निर्मित 'डॉ. तात्या लहाने... अंगार पॉवर इज विदीन' या मराठी सिनेमाचे विराग निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. "काळोखाला भेदून टाकू... जीवनाला उजळून टाकू" या गाण्यावर आधारित हे रिले सिंगिंग होणार आहे. एकूण १०८ शब्दांचं असलेलं हे गाणं ३०० गायक एकाच लयीत-सूरात गाणार आहेत. डॉ. तात्या लहाने... या सिनेमातील हे मूळ गीत विराग यांनी शब्धबद्ध केलं असून सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम यांच्या साथीने त्यांनी हे ड्युएट सॉंग गायलं आहे. 'एक हिंदुस्थानी' या संगीतकाराने हे गाणं कंपोझ केले आहे. रिले सिंगिंगचा सिनेमाच्या प्रमोशनसाठी वापर करणं हा भारतीय चित्रपट सृष्टीत पहिलाच प्रयोग असल्याने सगळ्यांचं लक्ष 'डॉ. तात्या लहाने... अंगार पॉवर इज विदीन' या सिनेमाकडे लागले आहे. या गाण्याच्या माध्यमातून डॉ लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना वाहिली आहे. त्यांचे समाजकार्य जगातील कानाकोपऱ्यात पोहोचावे या उद्धेशाने हा सिनेमा करत असल्याचे निर्माते-दिग्दर्शक विराग म्हणाले. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बालवाडीतलं प्रेम