Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘गानसरस्वती’ किशोरी आमोणकर यांचे निधन

‘गानसरस्वती’ किशोरी आमोणकर यांचे निधन
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका ‘गानसरस्वती’ किशोरी आमोणकर  (८५) यांचे निधन झाले आहे. मुंबईतील राहत्या घरी सोमवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास किशोरी आमोणकर यांची प्राणज्योत मालवली. किशोरी आमोणकर यांचा जन्म 10 एप्रिल 1931 रोजी मुंबईत झाला. प्रख्यात गायिका मोगूबाई कुर्डीकर या त्यांच्या आई, तर माधवदास भाटिया हे त्यांचे वडील होते. आईकडूनच संगीताचं ज्ञान घेतलेल्या किशोरी आमोणकर यांनी पुढे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. किशोरी आमोणकर या जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करत असत. किशोरीताई त्यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध. ख्याल गायकी बरोबरच त्या ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करत. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीताईंचे गाणे कसदार होते व रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत असे. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसेच पद्मभूषण पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दीपिकाने केली गंगाआरती