Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात मुंबईतही राडा

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात मुंबईतही राडा
, शुक्रवार, 8 सप्टेंबर 2023 (14:19 IST)
गौतमीचा डान्स, उर्जा आणि ठेका अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवतात. करिअरच्या सुरुवातीला केलेल्या चूका टाळून ती प्राण ओतून नाचते. तिचा नाच हाच तिचा 'यूएसपी' असल्याने तिच्या कार्यक्रमाला तरुणांची मोठी गर्दी असते. सहाजिकच गर्दी म्हटले की, वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येणे आलेच. या वेगळ्या लोकांमुळेच तिच्या कार्यक्रमात अनेकदा मोठा राडा होतो. कालच्या (7 सप्टेंबर) दहीहंडी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमातही असाच राडा झाला ऐक तरुण इतका वेडापीसा झाला होता की, त्याला स्टेजवरच जायचे होते आणि गौतमी पाटीलसोबत डान्स करायचे होते.
 
गावखेड्यांमध्ये डान्स करणारी ती मुंबईसारख्या झगमगाटी दुनियेत तिला कसे स्वीकारले जाईल? असे अनेकांना वाटत होते. पण शहरातही तीची चांगलीच क्रेझ पाहायाल मिळाली. तिने काल मुंबई शहर आणि ठाण्यातील काही दहीहंडी कार्यक्रमांना हजेरी लावली. सर्व कार्यक्रम चांगले पार पडले मात्र मुंलूंडमधील कार्यक्रमात मात्र राडा झाल्याचे समजते.
 
काय घडले नेमके?
गौतमीच्या एका चाहत्याला स्टेजवर चढून गौतमीसोबत डान्स करायचा होता तेव्हा उपस्थितांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. आयोजक आणि पब्लिकनेही त्याला समजावले. पण गौतमीच्या प्रेमात वेडापीसा झालेल्या या तरुणाला काहीही करुन स्टेजवरच जायचे आणि नाचायचे होते. ज्यामुळे कार्यक्रमस्थळी वातावरणही तंग झालं. अखेर पब्लिकचा संयम संपला.  अर्थात, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत त्या तरुणाला पब्लिकच्या तावडीतून बाहेर काढले खरे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Varun Dhawan Injured शूटिंगदरम्यान वरूण धवन जखमी