Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 27 April 2025
webdunia

लावणी गायिका यमुनाबाई वाईकर यांचे निधन

lavni gayika yamuna bai vaikar
, मंगळवार, 15 मे 2018 (17:34 IST)
सुप्रसिद्ध लावणी गायिका यमुनाबाई वाईकर (१०२ )यांचे आज अल्प आजाराने खासगी रूग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर वाई येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. यमुनाबाईंना कलेतील योगदानामुळे भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय  महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार, अखिल भारतीय मराठी परिषद पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, लावणी सम्राज्ञी पुरस्कार, नाट्यगौरव पुरस्कार, संगीत क्षेत्रात अतिशय मानाचा समजला जाणारा संगीत नाटक अकादमी अवॉर्ड व देशातील अतिशय मानाच्या समजल्या जाणार्‍या पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलेले आहे. सुमारे बावीस राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. मराठी तमाशा क्षेत्रात त्यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. तमाशा क्षेत्राला एक वेगळा आयाम देण्याचे काम यमुनाबाई वाईकर यांनी केलेले आहे.

 यमुनाबाई यांचा जन्म ३१ डिसेंबर १९१५ रोजी वाई येथे झाला होता. घरातच त्यांना लावणी व तमाशाचे बाळकडू मिळाले होते. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी स्वत:चा तमाशा फड काढला होता. यमुना-हिरा-तारा वाईकर संगीत पार्टी अशा नावाने यमुनाबाईंनी आपल्या लावणीच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. महाराष्ट्रात गाजलेल्या अनेक फक्कड लावण्या त्यांनी तयार केल्या.ठुमरी, तराणा, गझल आदी संगीतप्रकार त्या सहजतेने गात असत. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मर्द असण्याची निशाणी