rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या , हा बिबट्या आला तरी कुठून !

Leopard on the set of Marathi series
, शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (11:26 IST)
मराठी मालिकेत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा मराठी मातीत तयार झालेला रांगडा व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख मिळवणारा आपला सर्वांचा लाडका हार्दिक जोशी याने मराठी मालिका तुझ्यात जीव रंगला मध्ये राणादा ची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तो सर्वांचा लाडका राणादा झाला आणि मालिका प्रचंड गाजली. आता हार्दिक एका नव्या मालिकेत 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ' मध्ये एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे .या मध्ये तो सिद्धार्थ चे पात्र साकारत आहे. एकत्र कुटुंब पद्धतीची ही मालिका देखील प्रेक्षकांना आवडत आहे. सध्या या मालिकेशी निगडित काही चर्चा सुरु आहे. चर्चेचं कारण म्हणजे या मालिकेच्या सेट वर काही काळ बिबट्याचा वावर होता. हा बिबट्या तेथील असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे पण या बाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या मालिकेच्या एका भागात असं दाखविण्यात आले आहे की आदितीला सिद्धार्थ बिबट्यापासून वाचवतो . मालिकेच्या याच भागाच्या चित्रीकरणाचा येऊ भाग  असल्याचे सांगितले जात असून लवकरच हा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं 'ही मालिका एकत्र कुटुंब पद्धतीची असून प्रेक्षकांकडून पसंत केली जात आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देवच ऐकत नाही