Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सौ. प्रताप मानसी सुपेकर’च्या सेटवर मकर संक्रांतीचा आनंदोत्सव

mansi pratap supekar marathi bana
, शनिवार, 13 जानेवारी 2024 (15:48 IST)
मकर संक्रांती जवळ आल्याने शेमारू मराठीबाणाच्या कलाकारांनी 'सौ. प्रताप मानसी सुपेकर'च्या सेट वर मकर संक्रांतीचा सण साजरा केला. उत्कंठा वाढवणारी, मुख्य पात्र म्हणजेच प्रतापची भूमिका साकारत असलेले प्रदीप घुले आणि मानसीची भूमिका साकारत असलेली तन्वी किरण ह्यांचे शोमध्ये नुकतेच झालेल्या लग्नानंतर त्यांची पहिली संक्रांती एकत्र साजरी केली, ज्यामुळे हा प्रसंग आणखी संस्मरणीय झाला.
 
मालिकेमध्ये प्रतापची व्यक्तिरेखा साकारणारे प्रदीप घुले, त्यांनी शोच्या सेटवर मकर संक्रांति कशी साजरी केली ते सांगितले, "मकर संक्रांती हा सण आम्ही अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा करतो. एखादी नवीन वस्तू खरेदी केली किव्हा कोणाकडून मिळाली तर ती वस्तू आम्ही देवासमोर आदर आणि आपलेपणाने ठेवतो. पण ह्यावर्षी हा सण आमच्या 'सौ. प्रताप मानसी सुपेकर' ह्या शोच्या सेटवर साजरा केला आणि सेटवरील मारक संक्रांतीचा हा एक अनोखा आणि आनंददायी अनुभव होता. माझ्या सहकलाकारांसोबत पतंग उडवणे आणि तिळगुळ वाटणे यामुळे आमच्या दिवसाला एक उत्सवी स्पर्श आला. वातावरण आनंदाने आणि हास्याने भरून गेले. माझ्या सहकलाकारांसोबत हा शुभ सोहळा साजरा करताना खूप आनंद झाला आणि आम्ही एकत्र सुंदर आठवणी निर्माण केल्या.
 
webdunia
मालिकेमध्ये मानसीची व्यक्तिरेखा सुंदरपणे साकारणाऱ्या तन्वी किरणने तिच्या मनातील मकर संक्रांती विषयी भावना शेअर केल्या, ती म्हणाली, "मकर संक्रांती हा केवळ एक सण नाही; तो आपल्या प्रियजनांसोबत असलेल्या प्रेमळ बंधांचा उत्सव आहे. आणि या वर्षी 'सौ. प्रताप मानसी सुपेकर' च्या सेटवर आम्ही माझ्या सहकलाकारांसह पतंग उडवण्याच्या उपक्रमात सहभागी झालो आणि त्यामुळे ही संक्रांत खरोखरच संस्मरणीय ठरली. तिळगुळांनी भरलेल्या पदार्थांचा सुगंध आणि तिळगुळाचा गोडवा याने उत्सवाला एक स्वादिष्ट चव दिली. तिळगुळ वाटून आणि सर्वांसोबत गोड शब्दांची देवाणघेवाण केल्याने एक उत्साही आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले. हा केवळ एक उत्सव नव्हता, तो एक बंध आणि एकजुटीचा क्षण होता जो दीर्घकाळ जपला जाईल."
 
webdunia
सण साजरा करण्यासाठी मालिकेच्या सेलेब्रिटीनीं सुंदर पारंपारिक पोशाख घातले होते. एकता आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या एका रोमांचक पतंग उडवण्याच्या कार्यक्रमाने दिवसाची सुरुवात झाली. सेटवरील कलाकारांनी तिळगुळ, तिळापासून बनवलेले गोड पदार्थ, उत्सवाला एक आनंददायी आणि पारंपारिक चव आणून दिली. हा गोड हावभाव दयाळू शब्द सामायिक करणे आणि प्रियजनांमध्ये संबंध मजबूत करणे सूचित करतो.
 
शेमारू मराठीबाणाच्या या हृदयस्पर्शी उत्सवात सामील व्हा कारण आम्ही मकर संक्रांतीचा आनंद घेऊन येत आहोत. पाहत राहा 'सौ. प्रताप मानसी सुपेकर’, दर सोमवार ते शनिवार रात्री ९.०० वाजता, फक्त शेमारू मराठीबाणा वर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवरायांचा छावा' चित्रपटाचे चित्तथरारक पोस्टर भेटीला