अभिनेता दिनेश साळवी यांचे निधन

अभिनेते, दिग्दर्शक आणि मराठी लेखक दिनेश साळवी (५३) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.  बुधवारी रात्री मुंबईतील विले-पार्ले रेल्वे स्थानकात छातीत दुखू लागल्याने त्‍यांना आसपासच्या लोकांनी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. 
 
दिनेश साळवी यांनी अनेक नाटक आणि मालिकांमध्‍ये काम केले आहे. महाविद्‍यालयातही त्‍यांनी अनेक एकांकिका बसवल्‍या आणि कामही केले आहे. रंगभूमीवरही त्‍यांनी काम केले. सीआयडीसह अनेक मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी काम केले होते.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख आलिया व रणबीरच्या नात्यात अंतर?