Publish Date: Wed, 08 Apr 2026 (16:04 IST)
Updated Date: Wed, 08 Apr 2026 (16:10 IST)
मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री नंदिता पाटकर नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तिच्या सुंदर रूपाने आणि मराठमोळ्या लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
अभिनेत्री नंदिता पाटकर हिने नाट्य दिग्दर्शक विपुल महागावकर यांच्याशी विवाह केला असून, त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत.
नवा प्रवास: 'एलिझाबेथ एकादशी', 'खारी बिस्किट' आणि 'सहकुटुंब सहपरिवार' यांसारख्या कलाकृतींतून लोकप्रिय झालेली नंदिता आता वैयक्तिक आयुष्यात एका नवीन वळणावर आहे. तिने अत्यंत साधेपणाने हा विवाह सोहळा उरकला.
कोण आहेत विपुल महागावकर?
विपुल महागावकर हे मराठी रंगभूमीवरील एक नावजलेले लेखक आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी 'पै पैशाची गोष्ट' आणि 'उध्वस्त धर्मशाळा' यांसारख्या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. एका बॅकस्टेज आर्टिस्टपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो.
खाजगी आयुष्य: नंदिताने काही काळापूर्वीच एका मुलाखतीत तिच्या पहिल्या लग्नाबद्दल आणि घटस्फोटानंतरच्या कठीण काळाबद्दल मोकळेपणाने भाष्य केले होते. त्या संघर्षातून सावरून तिने आता विपुल यांच्यासोबत आनंदाने आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.