Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Short and Sweet : एका अनोख्या कुटुंबाची विलक्षण गोष्ट

short and sweet movie
, शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2023 (16:03 IST)
वडिल आणि मुलाचे नाते हे नेहमीच संवेदनशील असते. मुळात वडिल आणि मुलाचे नाते आईच्या माध्यमातून जोडले जाते. ती या दोघांमधील दुवा असते. त्यामुळे या नात्यात खरी कसोटी असते ती आईची. या नात्यात सुसंवाद साधला गेला तर हे नाते खूप सुंदर बहरू शकते. अशाच नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘शॅार्ट अँण्ड स्वीट’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शुभम प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे गणेश कदम दिग्दर्शक आहेत. तर पायल गणेश कदम, विनोद राव निर्माते आहेत. सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांची गोड कथा सांगणारा हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 
 आपल्या वडिलांना भेटण्याची तीव्र ओढ असतानाच एक अशी व्यक्ती वडिल म्हणून समोर येते, ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केलेली नसते. अशा वेळी मुलाची झालेली अवस्था, वडिल म्हणून त्यांना स्वीकारताना मनात होत असलेली चलबिचल यात पाहायला मिळणार आहेत. त्याच्या आईने इतक्या वर्षांपासून वडिलांची ओळख का लपवून ठेवली आणि मुलगा कारण कळल्यानंतर वडिलांना स्वीकारणार का, या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहे.
 
 या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गणेश दिनकर कदम म्हणतात, ‘’ या चित्रपटाची कथा नावाप्रमाणेच अतिशय स्वीट आहे. वडिल मुलाच्या नात्यात नेहमीच गुंतागुंत असते. परंतु काही गोष्टी मान्य केल्या, सुसंवाद साधला तर हे नाते नक्कीच चांगले होऊ शकते. हेच दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असून यात धमालही आहे. ‘’

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Dussehra 2023: दसर्‍यानिमित्त भगवान श्रीरामांच्या या मंदिरात भेट द्या