Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'बाईपण भारी देवा'चा ट्रेलर See Video

'बाईपण भारी देवा'चा ट्रेलर See Video
Marathi Movie Baipan Bhari Deva Trailer Released जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला.
 
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. 
 
सिनेमाचं नाव जसं भारी भरकम आहे तशीच सिनेमातील स्टारकास्टही तगडी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अश्या मातब्बर अभिनेत्री एकत्र पडद्यावर पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

मंगळा गौर स्पर्धेत भाग घेण्यासाठी वंदना गुप्ते कशा प्रकारे आपल्या बहिणींची टीम तयार करतात तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असलेल्या घडामोडी, जबाबदार्‍या हे सर्व यात दाखवण्यात आले आहे. यात बायकांच्या जीवनात येणारे अडथळे आणि त्यावर त्या खंबीरपणे कशी मात करतात हे पाहयला मिळतं. 
 
'बाईपण भारी देवा' आता प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला असून 30 जून 2023 रोजी चित्रपटगृहात आपल्या भेटीस येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'तितली उड़ी' गाण्याची प्रसिद्ध गायिका शारदा राजन यांचे निधन