Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ved Box Office Collection:रितेश-जेनिलियाचं चाहत्यांना वेड

ved marathi movie
, मंगळवार, 3 जानेवारी 2023 (09:42 IST)
रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूझा यांना ऑफस्क्रीन तसेच पडद्यावरही खूप पसंत केले जाते. दोघांची जोडी चाहत्यांच्या आवडत्या जोडींपैकी एक आहे. नुकतेच दोघांनी अनेक वर्षांनी स्क्रीन शेअर करून लोकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांच्या 'वेड' या मराठी चित्रपटाने थिएटरमध्ये धमाल केली आहे. वेडच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.
  
रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा यांच्या 'वेड'च्या ओपनिंग वीकेंडवरील कमाईचे आकडे जाणून तुम्हालाही धक्का बसेल. या चित्रपटात दोघांनी नवरा-बायकोची भूमिका साकारली आहे. रितेशच्या मराठी चित्रपटाला सर्व चित्रपट समीक्षक खूप सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत.
 
पहिल्या वीकेंडला इतके कोटी
यासोबतच प्रेक्षकही 'वेड'चे कौतुक करताना थकत नाहीत. त्यामुळेच 'वेड'च्या कमाईचे आकडे दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. सोमवारी, प्रसिद्ध व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर 'वेड' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या आकडेवारीची माहिती दिली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या वीकेंडमध्ये 10 कोटींहून अधिक कमाई करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.
 
पूर्ण आठवड्याची कमाई
त्याच वेळी, हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. रितेश देशमुखच्या 'वेड' ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे, याचे उदाहरण तुम्हाला चित्रपटाचे कलेक्शन पाहून नक्कीच कळले असेल. रिलीजच्या पहिल्या दिवशी मराठी चित्रपट 'वेड'ने बॉक्स ऑफिसवर 2.25 कोटी, दुसऱ्या दिवशी 3.25 कोटी आणि रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी 4.50 कोटींची कमाई केली आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी 'वेड'च्या कमाईच्या आलेखात मोठी झेप घेतली आहे. आता हा चित्रपट पुढे काय दाखवतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Edited by : Smita Joshi 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कपिलची एका युझरने पोलखोल केली आहे ज्यामुळे तो चांगलाच ट्रोल होतोय