Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वप्नील-रुचा चा रोमान्स दाखवणारे 'ये आता' गाणे प्रदर्शित Video

marathi movie ye aata
, गुरूवार, 20 जुलै 2017 (12:46 IST)
मराठी चित्रपटसृष्टीचा रोमँटिक हिरो स्वप्नील जोशीचा सिनेमा म्हंटल्यावर त्यात एखादे प्रेमगीत हे असायलाच हवे !  स्वप्नील आणि रोमान्स हे सूत्र आगामी 'भिकारी' सिनेमातील 'ये आता' या गाण्यातही आपल्याला पाहायला मिळत आहे. मी मराठा एंटरटेनमेंटचे शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य निर्मित तसेच जीसिम्सचे कार्तिक निशानदार व अर्जुन बरन यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमातील 'ये आता' हे रॉमेंटिक गाणे सध्या खूप गाजत आहे. नवोदित अभिनेत्री रुचा इनामदार आणि स्वप्नील जोशीवर आधारित असलेल्या या गाण्यातील दृश्य पाहणाऱ्यांची डोळे दिपवून टाकत आहे. 
webdunia
'स्वामी तिन्ही जगाचा...भिकारी' या सिनेमाच्या प्रत्येक गाण्यात दिग्दर्शक गणेश आचार्य यांचा स्पेशल टच दिसून येत असल्यामुळे, 'ये आता' हे प्रेमगीतदेखील त्याला अपवाद नाही. छायाचित्रकार महेश लिमये यांच्या कॅमेऱ्यात चित्रबद्ध झालेल्या या गाण्यातील दृश्य लंडन येथे चित्रित करण्यात आली असून, यात स्वप्नील आणि रुचाची एक वेगळीच कॅमिस्ट्री रसिकांना पाहायला मिळत आहे. 
webdunia
गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला विशाल मिश्रा यांनी संगीत दिले असून, स्वप्नीलचे बोल खुद्द विशाल मिश्रा यांनीच गायले आहेत. तसेच हिंदीची सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानने रुचाचे बोल गात, हे गाणे अधिकच सुमधुर केले आहे. आई आणि मुलाच्या भावनिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा येत्या ४ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.  यात स्वप्नील जोशी आणि रुचा इनामदार या जोडीसोबतच कीर्ती आडारकर, गुरु ठाकूर, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे आणि प्रदीप काबरा ह्या कलाकारांचीदेखील विशेष भूमिका असणार आहे. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Whats app message : आज ठरवलं.....