Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

नसिरुद्दीन शाह घेत आहेत मराठीचे धडे

Naseeruddin shah
मराठी सिनेमांचे हिंदी रिमेक तयार होत आहेत. काही कलाकार मराठी सिनेमात कामही करत आहेत. अक्षयकुार, प्रियांका चोप्रा यासारखे कलाकार मराठी सिनेमा निर्मिती क्षेत्रात उतरले आहेत. आमिर   खाननेसुद्धा वेळोवेळी त्याचा मराठी बाणा दाखवला आहे. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेता नसिरुद्दीन शाह. पण जोवर अस्खलित मराठी बोलता येणारनाही तोवर मोठी भूमिका  साकारणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मराठी बोलता यावं यासाठी नसिरसाहेब तितकीच मेहनत घेत आहेत. मराठी भाषा शिकण्याचा आणि ती लवकरात लवकर आत्मतसात करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी त्यांना एक खास व्यक्ती मदत करत आहे. हीच व्यक्ती त्यांची मराठीची गुरु आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून नसिरसाहेबांची पत्नी आणि अभिनेत्री रत्ना पाठक या आहेत. नसिरसाहेबांसाठी त्यांची पत्नी त्यांच्यासाठी मराठीची गुरु आहे. रत्ना यांच्याकडूनच ते मराठीचे धडे घेत आहेत. नसिरुद्दीन शाह यांनी 2011 साली उमेश कुलकर्णी दिग्दर्शित 'देऊळ' सिनेमातून मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वी 'न्यूड' सिनेमातही   भूमिका साकारली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जे हवे त्यात अपयशच मिळाले - कंगना