केतन भाई सोमैय्या आणि जय केतन भाई सोमैय्या निर्मित “नाशिकचा मी अशिक " हे नाशिकची गाथा सांगणारं नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या गाण्याचा टिझर नुकताच लॉन्च झाला असून त्याचा व्हिडीओ आत्तापर्यंत ६८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पहिला आहे आणि येत्या काळात हि संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. सोशल मिडियावरही या टिझरला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळत आहे. यावरूनच या गाण्याची क्रेझ लक्षात येते. या गाण्यासाठी प्रसिद्ध गायक प्रवीण कुवर आणि हर्षवर्धन वावरे यांनी आवाज दिला असून दिग्दर्शन प्रसाद आप्पा तारकर यांनी केले आहे.
गाण्याच्या ओळींवरूनच हे गाणं नाशिककरांच्या मनाचा ठाव घेणारं हे समजून येतं. संगीतकार प्रवीण कुवर यांनी हे गाणं संगीतबद्ध केले आहे. तर हे गाणं ध्वनिमुद्रित केले आहे. अवधूत वाडकर यांनी नाशिकच्या भव्यतेचा तसेच निसर्ग सौंदर्याचा विचार करूनच या गाण्याची रचना केली असल्याचे गीतकार मंदार चोळकर सांगतात.
या गाण्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे, बिग बॉस फेम स्मिता गोंदकर तसेच काहे दिया परदेस फेम सायली संजीव, अभिनेत्री मयुरी शुभानंद आणि नाशिकचे कलाकार या गाण्यात झळकणार आहेत. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन करणार असून लवकरच नाशिक येथेच या गाण्याच्या चित्रीकरणाचा शुभारंभ केला जाणार आहे.