Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेत्री नेहा पेंडसेबद्दल नेटकरी करतात संताप

neha pendse
, शनिवार, 1 एप्रिल 2023 (21:33 IST)
अभिनेत्री नेहा पेंडसे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती विविध पोस्ट शेअर करून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. पण आता तिने पोस्ट केलेला एक व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेला नाही. तिने केलेली कृती पाहून सोशल मीडियावर नेटकरी तिच्याबद्दल संताप व्यक्त करत आहेत.
 
नेहाने नुकताच तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये ती एका रेस्टॉरंटमध्ये दिसत असून तिने हातामध्ये काही प्लेट्स एकावर एक ठेवल्या आहेत. तर दुसऱ्या हातात पकडलेली प्लेट इतर प्लेटवर आपटून ती सर्व प्लेट्स फोडत आहे. ही गोष्ट ती अत्यंत एन्जॉय करत करताना दिसत आहे. पण तिचं हे वागणं पाहून नेटकरी चांगलेच नाराज झाले आहेत.
 
या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिलं, “तुझ्याकडे पैसे जास्त झाले असतील तर ही फालतू कामं बंद करून थोडं डोनेशन कर.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “आता हे सगळं साफ कोण करणार?” तर आणखी एकाने लिहिलं, “हे असं करण्याची काहीही आवश्यकता नाहीये. हे सगळं तू साफ करणार आहेस का? उगाचच दुसऱ्यांची काम का वाढवतेस?”
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Puneri Pati आपलंच घर समजा