Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवीन वर्षाचे कोट - अभिनेत्री / अभिनेता

new year quotes
, शुक्रवार, 30 डिसेंबर 2016 (12:39 IST)
रितेश देशमुख सारखा चांगला मित्र मिळाला
नवीन वर्षाची सुरुवात लवकरच होणार आहे, त्यामुळे ठिकठिकाणी नववर्षाच्या स्वागताची तयारी देखील सुरु झाली आहे, नववर्षाच्या लेट नाईट पार्ट्याना देखील आता उत येईल. अशावेळी योग्य ते भान ठेवून नववर्षाचा आनंद उपभोगा, असा संदेश मी आजच्या पिढीला देतो. जे कराल ते लक्षपूर्वक आणि काळजी घेऊन करा, जेणेकरून त्यात तुम्हाला यश मिळेल. नवीन वर्षात माझे देखील काही प्लेन्स आहेत. एक चांगला दिग्दर्शक आणि लेखक म्हणून मला नाव कमवायचे आहे, पुढील वर्षी मी दिग्दर्शित केलेला एक चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. त्याच्याच तयारीत सध्या मी खूप व्यस्त आहे. असे असले तरी, नवीन वर्षाच्या आनंदात जुन्याला विसरून चालत नाही. यंदाचे माझे वर्ष संमिश्र असे गेले, अनेक नवे मित्र यावर्षी मला मिळाले , त्यातलाच एक रितेश देशमुख. स्टार प्रवाह च्या 'विकता का उत्तर' या मालिका च्या शुटींगच्या निमित्ताने मला रितेशी संपर्क आला. तो एक चांगला माणूस असून, आम्ही चांगले मित्र बनलो आहोत. पुढील वर्षी देखील अशीच नव्या लोकांशी भेटीगाठी वाढत राहो, अशी माझी इच्छा आहे.
हृषीकेश जोशी- अभिनेते, लेखक, दिग्दर्शक 

webdunia
आयुष्यात एकसूत्रीपणा आणण्याचा प्रयत्न करेल.   
मनातून सर्व नकारात्मक विचार दूर करून एक छान सकारात्मक जीवन जगण्याचा प्रयत्न मी पुढील वर्षी करणार आहे.  माझे काम आणि खाजगी आयुष्य यात एकसूत्रीपणा आणण्याचा माझा संकप असेल. चालू वर्षी कामाच्या ओघात माझे शेड्यूल्ड खूप विस्कळीत झाले होते, त्यामुळे आगामी वर्षात या सर्व गोष्टींची मी पुरेपूर काळजी घेण्याचे ठरले आहे. तसेच नेहमीच्या त्याच त्याच भूमिकेच्या बाहेर जाऊन वेगळी भूमिका करण्याचा विचार मी सण २०१७ रोजी करणार आहे. मुळात त्यासाठी मी माझे प्रयत्न देखील सुरु केले असून, आगामी वर्षात 'करार' आणि 'ट्रकभर स्वप्न' या माझ्या दोन चित्रपटातील माझ्या भूमिका या खूप वेगळ्या आहेत. चाकोरीबद्ध भूमिकेतून बाहेर पडण्याचा माझा हा मानस आगामी वर्षात पूर्ण करेल, तसेच निर्मितीक्षेत्रातही विशेष काहीतरी करण्याची इच्छा आहे. 
क्रांती रेडकर- अभिनेत्री
webdunia
विविध धाटणीच्या भूमिका करायच्या आहेत
नवीन विषय आणि नवीन बांधणीचे चित्रपट करायला मला पहिल्यापासून आवडतात, २०१७ वर्षी देखील मी अशाच धाटणीचे सिनेमे करणार आहे.  'जोगवा', 'येलो' यांसारख्या सामाजिक विषयावर हाथ घालणारे आणखीन सिनेमे मला करायचे आहेत. मुळात माझ्या या वेगळ्या भूमिकेंमुळे मला चळवळीचा अभिनेंता असे लोक संबोधू लागले आहेत. माझा पुढील वर्षी येणारा 'क्षितीज' हा सिनेमा देखील याच धाटणीचा आहे. शिक्षणासाठी एका मुलीचा संघर्ष यात मांडला असून, यात मी वैधार्भीय शेतकऱ्याची भूमिका करत आहे. लोकांना हा सिनेमा आवडेल अशी मी आशा करतो.
उपेंद्र लिमये- अभिनेता 
 
 
webdunia
निवडक काम करण्याचा संकल्प
न्यू इयर रिजोल्यूशन शक्यतो मी करत नाही. पण दर वर्षी मला करायच्या असलेल्या १० गोष्टींची यादी बनवते आणि त्या कशा पूर्ण होतील यावर लक्ष्य केंद्रित करते. पण ह्या वर्षी माझा प्लान जरा वेगळा असेल. यंदाच्या वर्षी मी अनेक सिनेमे साईने केले होते, मात्र काही कारणास्तव मोजकेच चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे कोणतेही काम सुरु करण्याआधी त्याच संपूर्ण माहिती गोळा करण्याचा संकल्प मी २०१७ ला करणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच माझा 'फुगे; हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तसेच अजून काही सिनेमे आहेत, ज्यात मराठीच्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची मला संधी मिळाली असल्यामुळे नवीन वर्षासाठी मी खूप उत्सुक आहे. 
प्रार्थना बेहेरे- अभिनेत्री
webdunia
वजन कमी करणार
आगामी वर्षासाठी मी आधीच योजना आखून ठेवली आहे. सर्वप्रथम स्वतःच्या आरोग्याकडे मी लक्ष द्यायचे ठरवले आहे, त्यासाठी नियमित व्यायाम आणि पथ्यपाणी करून वाढलेले वजन नियंत्रित करण्याचा संकल्प मी आखणार आहे. चालू वर्षात कामाचा खूप व्याप होता, त्यामुळे स्वतःकडे लक्ष देता आले नव्हते. सध्या माझी स्टार प्रवाह वर  'गं सहाजणी' ही मालिका सुरु असून, त्यातील जुबेदा मोडक नावाची भूमिका मी साकारते आहे. लोकांना माझी ही व्यक्तिरेखा खूप आवडत असल्याची प्रतिक्रिया येत असल्यामुळे मी खुशीत आहे. आगामी २०१७ या वर्षीदेखील मी अशीच प्रेक्षकांना हसवत राहील, तुम्ही देखील माझ्यावर असेच प्रेम करत राहा. तुम्हा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.  
नम्रता आवटे- अभिनेत्री 
 
webdunia
संकल्प पूर्ण करण्याचा संकल्प 
मी मुळचा गोव्याचा असून माझे शिक्षण पुण्यातील ललित कला केंद्र मधून झाले आहे. शिक्षण संपताच मला झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले’ ह्या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यानंतर लगेचच ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ ह्या नाटकासाठी माझे काम सुरु झाले. त्यामुळे खऱ्या अर्थाने माझ्यासाठी हे वर्ष खूपच भाग्याचे ठरले. येणाऱ्या वर्षात माझ्या फिटनेस कडे अजून चांगल्या प्रकारे लक्ष देण्याचा माझा मानस आहे. त्याचप्रकारे  पुढील वर्षात नाटक आणि मालिकांसोबतच सिनेमांमध्येही काम करण्याची माझी इच्छा आहे. आता हीच माझी इच्छा पूर्ण करण्याचा माझा संकल्प आहे.
साईंकीत कामत, अभिनेता 
webdunia
करिअरच्या दृष्टीने नवीन वर्ष महत्वाचे 
यंदाचे वर्ष माझ्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून देणारे ठरले. हिंदीच्या छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील माझ्या प्रोजेक्टद्वारे मला विविध प्रकारच्या भूमिका यावर्षी मिळाल्या. २०१७ हे वर्ष देखील माझ्या करिअरसाठी महत्वाचे वर्ष असेल, याचे कारण म्हणजे मी  येणाऱ्या वर्षात अनेक सिनेमे साईन केले आहेत, आणि त्यातला एक सिनेमा बॉलीवूडचा असल्यामुळे मी त्याबाबत खुप उत्सुक आहे. नवीन वर्षाची सुरुवात करताना मी स्टे फीट, स्टे हेल्दी' हा माझा नेहमीचा फंडा कायम राखणार आहे, तसेच पी.एम. मोदिजींच्या स्वच्छतेच्या मोहिमेलादेखील माझ्या परीने मी सहाय्य करणार आहे. 
रिना अग्रवाल- अभिनेत्री 
 
webdunia
झाडे लावण्याचा संकल्प 
माझ्या व्यक्तिगत आयुष्यात मी जास्तीत जास्त झाडे लावून पर्यावरणाबाबत अवेरनेस वाढवण्याचा संकल्प पुढील वर्षात करणार आहे. झाडांमुळे जग आहे, आणि जग आहे, म्हणून आपण आहोत. त्यामुळे प्रत्येकांनी झाडे ही लावायलाच हवी. तसेच येणाऱ्या वर्षात ‘झाडे मातीच्या मनातील कविता’ हे माझे नाटकदेखील रंगभूमीवर येत असल्यामुळे मी खुश आहे. त्यासोबतच मुंबई-पुणे जुगलबंदी असणा-या माझ्या स्टार प्रवाह वरील 'आम्ही दोघे राजाराणी' या मालिका मधील पार्थ या हटके केरेक्टरची मज्जा देखील मी घेत आहे. आगामी वर्षात हा पार्थ रसिकांचे भरघोस मनोरंजन करेल, याची शाश्वती मी या वर्षाच्या सुरुवातीला देतो. 
मंदार कुलकर्णी, अभिनेता 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ सर्व प्रथम भारतामध्ये प्रदर्शित होणार