महाराष्ट्रातील हास्यजत्रा मध्ये आपल्या विशिष्ट शैलीत 'अगं अगं आई' म्हणत आपल्या कलेने महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हसवणारा कोकणातील कोहिनुर म्हणून ओळखला जाणारा ओंकार भोजने याने हास्यजत्रेतून एग्झिट केली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून ओंकारला नाव प्रसिद्धी मिळाली असून त्याने या कार्यक्रमाला राम राम ठोकला आहे .
त्याचे कारण असे की लवकरच ओंकार हा एका विनोदी कार्यक्रमात दिसणार असून त्याला सिनेमाच्या चित्रीकरणासाठी आणि त्याच्या खासगी कारणामुळे महाराष्ट्रातील हास्यजत्राला निरोप द्यावा लागत आहे. आता तो लवकरच पुढील महिन्यांपासून झी मराठीवरील सुरु होणाऱ्या 'फु बाई फु' या विनोदी कार्यक्रमात दिसणार आहे. तो आपल्या प्रेक्षकांना पुन्हा हसवायला येत आहे. ओंकार ने महाराष्ट्रातील हास्यजत्रा या कार्यक्रमातून बाहेर पडण्याच्या बातमीला दुजोरा दिलेला नाही. ओंकार ने 'कॉमेडीची जीएसटी एक्स्प्रेस', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', 'तुमच्यासाठी काय पण', 'एकदम कडक' या विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात आणि घरात जाऊन पोहोचला आहे. आता ओंकार नव्या विनोदी कार्यक्रमात 'फु बाई फु' च्या नवीन पर्वात येणार आहे.