Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'प्लॅनेट मराठी'च्या परिवारात भार्गवी चिरमुलेचा सहभाग

'प्लॅनेट मराठी'च्या परिवारात भार्गवी चिरमुलेचा सहभाग
, सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (11:00 IST)
मालिका, चित्रपट, नाटक, रिऍलिटी शो अशा अभिनयाच्या विविध माध्यमांमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे भार्गवी चिरमुले. भार्गवी आता 'प्लॅनेट मराठी'च्या परिवाराचा एक भाग बनली असून 'प्लॅनेट टॅलेंट'च्या यादीत आता तिचे नाव देखील झळकले आहे. 
 
भार्गवीने 'वहिनी साहेब', 'चार दिवस सासूचे', 'असंभव', 'पिंजरा', 'मोलकरीण बाई', 'सुवासिनी', 'भाग्यविधाता', 'स्वराज्यजननी जिजामाता' अशा विविध मालिकांमधून प्रेक्षकांना आपलंस केले. याव्यतिरिक्त 'संदूक' 'गोळाबेरीज, 'वन रम किचन', 'आयडियाची कल्पना', 'धागेदोरे' 'इष्कवाला लव' अशा अनेक चित्रपटांमधूनही ती झळकली. 'हिमालयाची सावली' आणि 'झोपी गेलेला जागा झाला' या नाटकांमध्येही भार्गवीने अभिनय केला असून 'एका पेक्षा एक' या रिऍलिटी शोमधून तिने आपले नृत्यकौशल्य प्रेक्षकांना दाखवले. इतकेच नाही तर या रिऍलिटी शोची ती विजेती ठरली. याशिवाय 'ढोलकीच्या तालावर' आणि 'फू बाई फू' या रिऍलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती. आपल्या सालस, सोज्वळ अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी छबी निर्माण करणाऱ्या भार्गवीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपला नवा लूक शेअर केला होता. तिचा हा नवा लूक प्रेक्षकांनाही खूप भावला. भार्गवी शास्त्रीय नृत्यात पारंगत असून ती योगा थेरपिस्ट आहे. अशी ही गुणी अभिनेत्री आता 'प्लॅनेट मराठी'च्या परिवारात सहभागी झाली आहे. 
 
'प्लॅनेट मराठी' या पहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा झाल्यापासूनच याची सर्वत्र चर्चा होती. याचे कारण म्हणजे सुरुवातीपासूनच 'प्लॅनेट मराठी'सोबत अनेक दिग्गजांची नावे जोडली गेलीत. या परिवारात दिग्दर्शक संजय जाधव, अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधव, सायली संजीव, गायत्री दातार, शिवानी बावकर, निखिल चव्हाण यांच्यासोबतच आता भार्गवी चिरमुले सुद्धा सामील झाली आहे. त्यामुळे येत्या काळात भार्गवी तिच्या चाहत्यांसाठी अभिनयाची मेजवानी घेऊन येणार हे नक्की! 
 
'प्लॅनेट मराठी' मधील आपल्या सहभागाबद्दल भार्गवी सांगते, ''मला या परिवारात सहभागी झाल्याचा खरंच खूप आनंद होतोय. या परिवारात अनेक दिग्गजांचा सहभाग असल्याने माझ्या करिअरचा आलेख उंचावण्यात याचा मला निश्चितच फायदा होणार आहे. 'प्लॅनेट मराठी'च्या निमित्ताने काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची संधी मिळत आहे. यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो?''
 
'प्लॅनेट मराठी'चे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर भार्गवीच्या 'प्लॅनेट टॅलेंट'मधील सहभागाबद्दल सांगतात, भार्गवीचे आमच्या या परिवारात मनःपूर्वक स्वागत. भार्गवीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंस केलं आहे आणि तिच्यासारख्या सर्वगुणसंपन्न अभिनेत्रीसोबत हा प्रवास करायला आम्हाला नक्कीच आवडेल. 'प्लॅनेट मराठी'च्या संकल्पनेला मिळत असलेला हा प्रतिसाद पाहता आपण योग्य दिशेने जातोय, असे वाटतेय. त्यामुळे मराठी कलाकारांसाठी हे नक्कीच उत्तम व्यासपीठ ठरेल, याची खात्री आहे.'' 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोनू ने शाळेत नेला गाढव