Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 16 April 2025
webdunia

दोस्तीच्या धम्माल 'पार्टी'चा टीझर लाँच

PARTY TEASER
, सोमवार, 16 जुलै 2018 (12:06 IST)
प्रत्येकांच्या आयुष्यात 'मित्र' हा असतोच! सुख-दुखांमध्ये निस्वार्थपणे सोबत देणारा हा यार आणि त्याच्या दुनियादारीची मज्जा काही औरच असते. हीच मज्जा सचिन दरेकर दिग्दर्शित आगामी 'पार्टी' सिनेमात पाहायला मिळणार आहे. मैत्रीचा हँगओव्हर चढवणा-या या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकताच टीझर लाँच करण्यात आला. 
webdunia
'पार्टी' च्या टीझरवर सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला या मराठीतील प्रसिद्ध युवाकलाकारांची झलक आपल्याला पाहायला मिळते. सहाजणांची रंजक गोष्ट आणि त्यांचे गमतीशीर किस्से या टीझरमध्ये आपल्याला दिसून येतात. या सिनेमाच्या टीझरवरून हा सिनेमा धम्माल विनोदी चित्रपट असल्याची जाणीव होते. प्रत्येक नाक्यानाक्यावर आढळणाऱ्या ओमी, चकऱ्या, सुमित, मनोज, अर्पिता आणि दिपालीची फक्कड मैत्री दाखवणारा हा सिनेमा २४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 'फ्रेन्डशिप डे'च्या महिन्यात प्रदर्शित होत असलेल्या या 'पार्टी'त सहभागी होण्यास प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मैत्रीचा सुंदर कोमल गजरा