Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोराने पिसारा फुलवत थुई थुई नाचावे.. बगळ्याने उंच भरारी घ्यावी.------सचिन गोस्वामी

sachin goswami
, शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (07:56 IST)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेला रामराम केला आहे. यात अभिनेत्री विशाखा सुभेदार, ओंकार भोजने आणि पंढरीनाथ कांबळे यांनीही या कार्यक्रमातून एक्झिट घेतली. यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला. या कलाकारांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडल्यानंतर आता दिग्दर्शकाने पोस्ट शेअर केली आहे.
 
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी काहीही उल्लेख केलेला नाही. मात्र ती पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
 
सचिन गोस्वामीची पोस्ट
“मोराने पिसारा फुलवत थुई थुई नाचावे.. बगळ्याने उंच भरारी घ्यावी. मोराने बगळ्याचे अनुकरण करू नये, बगळ्याने मोराचे अनुकरण करू नये. आपली क्षमता, विशेषता ओळखावी, नैसर्गिकता जपावी. सौंदर्य त्यातच आहे. कलाकृतीचेही असेच असते”, अशी पोस्ट सचिन गोस्वामी यांनी शेअर केली आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shankar Mahadevan: शंकर महादेवन यांना बर्मिंगहॅम सिटी विद्यापीठ करून डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले जाईल