Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंकजा मुंढे यांच्या हस्ते ‘समरेणू’चे पोस्टर प्रदर्शित

samrenu pankaja munde
, बुधवार, 6 एप्रिल 2022 (14:43 IST)
महेश डोंगरे दिग्दर्शित ‘समरेणू’चित्रपटाचे पोस्टर नुकतेच राजकारणातील लोकप्रिय व्यक्तिमत्व असणाऱ्या पंकजा मुंढे यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले असून या चित्रपटात महेश डोंगरे, रूचिता मांगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सम्या आणि रेणूची ही प्रेमकहाणी आहे. येत्या १३ मे रोजी चित्रपटगृहात ‘समरेणू’प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  
 
‘सुरवात महत्वाची नाय, शेवट महत्वाचाय…’अशी टॅगलाईन असल्येला या पोस्टरमध्ये सम्या आणि रेणू दिसत असून त्यांचा नात्याचा शेवट कसा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
 
पोस्टर प्रदर्शनाबाबत पंकजा मुंढे म्हणतात, '' या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मी उत्सुक आहे. याचे कारण हे निर्माते माझ्या जिल्ह्यातील आहेत आणि या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण बीड जिल्ह्यात झाले आहे. बीड जिल्ह्यात खूप कष्टकरी लोक आहेत, जे विविध राज्यात कामानिमित्ताने जातात. त्यांच्यात हुशारी असल्याने त्यांनी आपला ठसा विविध ठिकाणी उमटवला आहे. हा चित्रपट सफल व्हावा, याकरता मी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देते.'' 
 
 चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेता महेश डोंगरे म्हणतात, “हा माझा दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून पहिला चित्रपट आहे. त्यामुळे मला या चित्रपटाच्या प्रदर्शनाची खूपच उत्सुकता आहे. ही एक प्रेमकहाणी आहे. जास्त काही सांगणार नाही परंतु सम्या आणि रेणूच्या प्रेमाचा प्रवास एका रंजक वळणावर जाणार आहे. या चित्रपटाची संगीत टीम अतिशय जबरदस्त आहे. त्यामुळे चित्रपटाची गाणी प्रेक्षकांना नक्कीच आवडतील..”
 
एमआर फिल्म्स वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाचे लेखनही महेश डोंगरे यांनी केले आहे. सूरज- धीरज यांचे संगीत असलेल्या या गाण्यांना गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांचे शब्द लाभले आहेत. तर या गाण्यांना कुणाल गांजावाला, निती मोहन, आदर्श शिंदे आणि अजय गोगावले अशा दमदार गायकांचा आवाज लाभला आहे. धमाकेदार संगीत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती एमआर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अल्लू अर्जुनवर पोलिसांची करावाई