Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लॉकडाऊन नंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या 'जिंदगानी' या पहिल्या-वहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉंच!

webdunia
गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (18:45 IST)
कोरोनाच्या जागतिक आपत्तीवर मात करत आता अखेरीस अनलॉकची प्रक्रिया सुरु झालेली आहे. लॉकडाऊनमध्ये कंटाळलेल्या उदास मनांना उभारी आणण्यासाठी आता बंद पडलेलं करमणुकीच क्षेत्र नव्याने कामाला लागले आहे. आता लवकरच चित्रपटगृहांचे दरवाजे आपल्यासाठी उघडणार असून नर्मदा सिनेव्हीजन्स निर्मित आणि विनायक भिकाजीराव साळवे दिग्दर्शित 'जिंदगानी' चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे. 
 
'जिंदगानी' या आगामी चित्रपटाचे पोस्टर आज सोशल मीडियावर लॉंच करण्यात आले आहे. अभिनेते शशांक शेंडे व विनायक साळवे खेडेगावातील कठीण परिश्रम आणि संयमाचे उत्तम उदाहरण ठरणाऱ्या 'प्रभाकर' आणि 'सदा' या आदिवासी व्यक्तींच्या भूमिका साकारत असून या चित्रपटात त्यांच्यासमवेत अभिनेत्री सविता हांडे, सुष्मा सिनलकर, स्मिता प्रभू, सायली पाटील, अभिनेते विनायक साळवे, प्रदिप नवले, गणेश सोनवणे, प्रथमेश जाधव, रवि साळवे, सागर कोरडे, संजय बोरकर, दिपक तावरे, पांडुरंग भारती आढळून येणार आहेत. जिंदगानी चित्रपटाद्वारे वैष्णवी हिचे चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे. चित्रपटाचे लेखन विनायक भिकाजीराव साळवे यांनी केलेले असून विजय गवंडे यांनी चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. तर चित्रपटातील गाणी अजय गोगावले, आदर्श शिंदे, बेला शेंडे, राधिका अत्रे, अमिता घुगरी यांच्या सुरमधुर स्वरांनी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. 
 
नर्मदा सिनेव्हीजन्स निर्मित आणि विनायक भिकाजीराव साळवे दिग्दर्शित 'जिंदगानी' हा बदलत्या काळानुसार माणसाच्या बदलत्या जीवनशैलीची जीवनगाथा सांगणारा चित्रपट लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या 'मुंबई डायरीज २६/११' चा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित!