Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

"अश्या ह्या दोघी" रंगमंचावर पुन्हा अवतरणार

, सोमवार, 27 फेब्रुवारी 2017 (16:41 IST)
गेल्या काही वर्षांपासून जुन्या मराठी नाटकांना नव्याने रंगमंचावर आणण्याचे प्रयोग होताना दिसत आहेत. एकेकाळी गाजलेली हि नाटके आता नव्या रंगाढंगात प्रेक्षकांसमोर मांडली जात आहे. विशेष म्हणजे यापैकी काही नाटकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. त्यातलेच एक नाटक म्हणजे, 'अश्या ह्या दोघी'. सुलभा देशपांडे, रीमा लागू आणि लालन सारंग या दिग्गज अभिनेत्रीनी गाजवलेले हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर अवतरणार आहे. 
 
पुरुषी अहंकारासमोर होत असलेली स्त्री भावनांची कुचंबना मांडणारे हे व्यावसायिक नाटक १९ व्या शतकात मराठी रंगभूमीवर चांगलेच गाजले होते. या नाटकाचा विषय आणि त्याची झालेली प्रसिद्धी लक्षात घेता, मिता गिरकर यांच्या प्रचीती निर्मिती संस्थेअंतर्गत पुनश्च रंगमंचावर अवतरत असलेले हे नाटक नाट्यरसिकांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे. नुकताच या नाटकाचा लेखक गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते मुहूर्त संपन्न  झाला. दिग्दर्शक प्रशांत गिरकर यांच्या दिग्दर्शनाखाली  हे नाटक आता नव्याने प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाले असून कलाकारांची नावे सध्या गुपितच ठेवण्यात आले आहे. 
 
प्रशांत गिरकर यांनी यापूर्वी २००९ साली प्रदर्शित झालेल्या ईश्य या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच हिंदी आणि मराठीच्या छोट्या पडद्यावर देखील त्यांचा हातखंडा पाहायला मिळतो. "पुत्रकामेष्ठी  ही  त्यांनी दिग्दर्शित केलेली पहिली मालिका आहे. या मालिकेद्वारे प्रशांत गिरकर यांनी डेली सोपचा पायंडा घातला. यानंतर त्यांनी 'स्वामी समर्थ', 'रेशीमगाठी' 'समांतर' यांसारख्या मराठी तर 'साहब बीबी और टीव्ही' आणि "गुब्बारे" अशा हिंदी मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले असून 'कोण कोणासाठी', 'चौदा एके चौदा' या नाटकांच्या दिग्दर्शनाचा अनुभवसुद्धा त्याच्या गाठीशी आहे, त्यामुळे 'अश्या ह्या दोघी' हे नाटक नव्याने जिवंत करण्याचे सामर्थ्य ते ठेवतात. शिवाय त्यांच्या  कर्टन रेझर अकादमी ऑफ फिल्म अँड थिएटरे या अभिनय प्रशिक्षण कार्यशाळेअंतर्गत नवकलाकारांना अभिनयाचे धडे देखील मिळत आहे. त्याचप्रमाणे 'रफूचक्कर' आणि 'वणवा'  हे दोन आगामी सिनेमे लवकरच आपल्याला पाहायला मिळतीलe. अशाप्रकारे चित्रपट, मालिका आणि नाटक या अभिनयाच्या तिन्ही क्षेत्रांमध्ये दिग्दर्शनाची मोठी धुरा सांभाळणारे प्रशांत गिरकर यांचे 'अश्या ह्या दोघी' हे नाटक येत्या ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'ला ला लॅण्ड'चे नाव घोषित झाल्यानंतर मूनलाइटला मिळाला बेस्ट चित्रपटाचा अवॉर्ड